मितेश कुमार नाहाटा यांची महाराष्ट्र राज्य जैन समाज अल्पसंख्यांक महामंडळाच्या व्हा.चेअरमन पदी निवड..

दिनांक १५ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा:

लोणी व्यंकनाथ गावचे समाज भूषण स्व.बन्सीलाल शेठ नाहाटा यांचे नातू आणि श्री.बाळासाहेब नाहाटा यांचे चिरंजीव श्री.मितेश कुमार नाहाटा यांची महाराष्ट्र राज्य जैन समाज अल्पसंख्यांक महामंडळाच्या प्रथम व्हा.चेअरमन (उप मंत्री दर्जा) पदी निवड झाली आहे.

या महामंडळावर लोणी व्यंकनाथ गावचे सुपुत्र मितेश कुमार नाहाटा यांची नियुक्ती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित दादा पवार यांनी स्वतः शिफारस केली होती. त्यांच्या शिफारसीनुसार श्री. मितेश नाहाटा यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून या महामंडळावर व्हा. चेअरमन म्हणून नियुक्ती झाली.

यापूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसने श्री. बाळासाहेब नाहाटा यांना महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष करीत महाराष्ट्र राज्याच्या कृषी आणि पणन महामंडळावर संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली होती. आता हे दुसरे राज्य पातळीवरचे पद श्री. अजित दादा पवार यांनी दिल्यामुळे लोणी व्यंकनाथ गावाचे नाव तालुक्यासह महाराष्ट्राच्या नकाशावर उजळले आहे.

लोणी ग्रामस्थांच्या वतीने श्री. मितेश कुमार नाहाटा यांचे या नवीन पदासाठी अभिनंदन करण्यात आले आहे. त्यांच्या या कार्यामुळे लोणी व्यंकनाथ गावातील युवा पिढीला प्रेरणा मिळेल आणि समाजाच्या विकासासाठी नवे वाव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

श्री. मितेश नाहाटा यांचा सामाजिक कार्यातला अनुभव आणि त्यांनी केलेले प्रयत्न यामुळे हा नव्या पदासाठी त्यांचा मार्ग सुसाध्य झाला आहे. लोणी गावातली लोकसंख्या आणि त्यांच्या हितासाठी श्री. मितेश नाहाटा यांचे कार्य महत्वाचे ठरेल, अशी खात्री ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र राज्य जैन समाज अल्पसंख्यक महामंडळाच्या उपाध्यक्ष [उप मंत्री दर्जा] पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खा श्री सुनील तटकरे साहेब  श्री मितेष कुमार नाहाटा यांचा सन्मान करताना..
मितेश शेठ यांना शुभेच्छा देताना उप मुख्यमंत्री अजित पवार..

स्रोत:(प्रसिध्दी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading