भगवान(आबा) पाचपुते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; श्रीगोंदे तालुका अध्यक्षपदी निवड..

दिनांक ४ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा/मुंबई:

श्रीगोंदे तालुक्यातील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि लोकहितासाठी कार्यरत असलेले श्री भगवानआबा पाचपुते यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. श्री सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमात श्री पाचपुते यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीगोंदे तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

कार्यक्रमात राज्य बाजार समितीचे अध्यक्ष श्री बाळासाहेब नाहटा आणि कर्जत तालुका अध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे देखील उपस्थित होते. भगवानआबा पाचपुते यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

स्रोत:(प्रसिध्दी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading