पाचपुते यांची भावनिक सभा: विकासकामांवर भर, विरोधकांना संयमी उत्तर..

दिनांक १८ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे भाजप उमेदवार विक्रमसिंह पाचपुते यांच्या प्रचाराच्या सांगता सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार बबनराव पाचपुते यांनी आपल्या शेवटच्या भाषणात भावनिक साद घालत, आता आमदार म्हणून नव्हे तर ‘आमदाराचा बाप’ म्हणून काम करणार असल्याचे ठामपणे सांगितले.

सभेत विक्रम पाचपुते यांनी विरोधकांच्या आरोपांना संयमी शैलीत उत्तर देत विकासकामे हाच आपला अजेंडा असल्याचे स्पष्ट केले. एमआयडीसी व साकळाई प्रकल्पाच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी ठोस पावले उचलल्याचे सांगितले. विरोधकांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देताना, पाचपुते कुटुंबीयांनी एकतेचा संदेश दिला.

सभेच्या अखेरीस उपस्थित कार्यकर्ते व पाचपुते कुटुंबीय भावनिक झाले. महायुतीच्या पानसरे व नाहाटा यांनी मंचावर हजेरी लावत पाचपुते यांना पाठिंबा जाहीर केला. उपस्थितांनी विजयाचा निर्धार व्यक्त करत प्रचाराचा समारोप केला.

स्रोत:(सांगता सभा)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading