श्रीगोंदा व नगर विधानसभा मतदारसंघात आ.पाचपुते कुटुंबीयांचा विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग..

दिनांक ८ सप्टेंबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा व नगर विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये लोकनेते, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार श्री बबनरावजी पाचपुते साहेब, परीक्रमा संकुलाच्या अध्यक्षा आणि माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. सौ. प्रतिभाताई बबनराव पाचपुते आणि युवा नेते, भाजप प्रदेश उपाध्यक्ष श्री विक्रमसिंह बबनरावजी पाचपुते यांनी सहभाग घेतला.

श्रीगोंदा शहरातील जामा मशिद येथे मुस्लिम समाजासाठी इदगा मैदानाच्या बांधकामासाठी १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. या प्रसंगी आ. बबनरावजी पाचपुते आणि युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मुस्लिम समाजातील मोठ्या संख्येने बांधव उपस्थित होते.

टाकळी कडेवळीत येथे श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालयात माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक श्री शहाजी खेतमाळीस यांचे चिरंजीवांच्या साखरपुडा कार्यक्रमाला उपस्थित राहून पाचपुते साहेबांनी शुभेच्छा दिल्या. याच दिवशी श्रीगोंदा फॅक्टरी येथे कै. संगिता समीर थोरात यांच्या प्रथम पुण्यस्मरणासही आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात परीक्रमा संकुलाच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाचपुते देखील उपस्थित होत्या.

श्रीगोंदा शहरातील मेहता बिल्डिंगमध्ये नव्याने सुरू झालेल्या स्वराज वस्त्रदालनाचे उद्घाटन युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी दुकानाचे यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

श्रीगोंदा शहरातील ज्येष्ठ नागरिक श्री सुदाम तात्या झुंजरुक यांच्या मुलीने मातीपासून बनवलेली श्री गणेश मूर्ती पाहण्यासाठी विक्रमसिंह पाचपुते यांनी त्यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. तात्या यांच्या कुटुंबातील सदस्य यावेळी उपस्थित होते.

मुस्लिम समाजासाठी बांधण्यात येणाऱ्या इदगा मैदानाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या जागेची पाहणी करताना विक्रमसिंह पाचपुते यांनी प्रमुख मान्यवरांसह या महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत चर्चा केली.

स्त्रोत:(राजेंद्र उकांडे)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading