दिनांक ६ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:
आज दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबई मंत्रालय येथे राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे अध्यक्षते खाली शेती महामंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उद्योग वापरासाठी श्रीगोंदा तालुक्यातील मौजे पर्वतवाडी व महादेववाडी या कार्यक्षेत्रातील बेलवंडी फार्मची १३६९ एकर क्षेत्रापैकी ६१८ एकर जमीन औद्योगिक वापरासाठी देण्याचा निर्णय झाला आहे.
तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री नामदार उदय सामंत साहेब, माजी मंत्री व श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनरावजी पाचपुते साहेब, अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या पुढाकाराने ही शेती महामंडळाची जमीन ६१८ एकर वर श्रीगोंदा एमआयडीसी फेज १ प्रस्तावित करण्याचे ठरले आहे.
पुढील काही दिवसांमध्ये सर्व विभागाच्या आवश्यक परवानगी घेऊन श्रीगोंदा एमआयडीसी फेज १ ची लवकरच सुरुवात होईल. सदर बैठकीत महसूल मंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील, दृकश्राव्य माध्यमाद्वारे उद्योगमंत्री नामदार श्री. उदय सामंत साहेब यांच्यासह माजी मंत्री श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. बबनराव पाचपुते, दृकश्राव्य माध्यमाद्वारे खासदार डॉ. सुजय विखे पाटील, श्री विक्रमसिंह पाचपुते, श्री प्रतापसिंह पाचपुते, महसूल विभागाचे अप्पर सचिव श्री. राजगोपाल देवरा, नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त श्री राधाकृष्ण गमे, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, अहमदनगर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष येरेकर, शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री.विश्वजित माने, नाशिक एमआयडीसीचे मुख्यकार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा आणि शेती महामंडळ पुणे यांचे अधिकारी उपस्थित होते.

माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री नामदार फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार साहेब यांचे विशेष आभार मानले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
