११ वर्षांपूर्वी हरवलेला सिद्धार्थ रॉय बेलवंडी पोलीस व मानव सेवा प्रकल्पाच्या प्रयत्नांनी स्वगृही परतला..

दिनांक २ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:

बेलवंडी पोलीस स्टेशनने मे २०२३ व डिसेंबर २०२३ मध्ये वेठ बिगारीतून मुक्त केलेल्या २३ पीडितांपैकी २३ पीडितांची सांभाळ व पुनर्वसनासाठी तात्कालीन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी माननीय श्रीगोंदा न्यायालयाचा आदेश प्राप्त करून मानव सेवा प्रकल्पामध्ये ठेवले होते. आजपर्यंत एकूण ७ पीडित, जे अत्याचार झाल्यामुळे मनोरुग्ण झाले होते, त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन मान्य न्यायालयाचा आदेश प्राप्त करून त्यांना स्वगृही पाठविण्यात आले.

आज वेठबिगार गुन्ह्यांमधील पीडित सिद्धार्थ रॉय यास त्याची बहीण इशाका रॉय, भावजी सुभाशिस दास, राहणार काकिनारा, नारायणपूर, उत्तर २४ परगणा, पश्चिम बंगाल यांच्या ताब्यात मा. न्यायालयाच्या आदेशावरून देण्यात आले आहे. सदरचा गुन्हा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात बेलवंडी पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने दाखल करून हेड कॉन्स्टेबल खेडकर यांनी तपास केला होता. सिद्धार्थ रॉय हा पश्चिम बंगाल येथील रहिवासी असून, तो ११ वर्षांपूर्वी हरवला होता व त्यास मयत घोषित करण्यात आले होते.

सिद्धार्थ रॉयचे नातेवाईक त्याला भेटल्यानंतर भावविभोर झाले व आनंदाश्रू तरळले. त्यांनी पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे, उपविभागीय अधिकारी श्री. विवेकानंद वाखारे साहेब, बेलवंडी पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांच्या टीमचे (PSI चाटे, PSI गाजरे, ASI शिंदे, कोळपे, पोहेकॉ खेडकर, हसन शेख, गांगर्डे, झुंजार, पोना नंदू पठारे, पोना जावेद शेख, पोकॉ विनोद पवार, पोकॉ कैलास शिपणकर, पोकॉ संदीप दिवटे, पोकॉ सतीश शिंदे, पोकॉ सोनवणे, पोकॉ भांडवलकर, मपोना सुरेखा वलवे तसेच मानव विकास प्रकल्पाचे श्री. शिराज शेख व टीमचे आभार मानले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading