विसापूर दुरक्षेत्रात अंमलदाराच्या अभावी अवैध धंद्यांचा उच्छाद..

दिनांक २७ जुन २०२४, श्रीगोंदा:

बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विसापूर दुरक्षेत्रात गेल्या एक महिन्यापासून बिट अंमलदाराची नियुक्ती न झाल्याने मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांनी उधाण आले आहे. सहाय्यक फौजदार आर. टी. शिंदे यांची ३१ मे रोजी सेवानिवृत्ती झाल्यापासून विसापूर दुरक्षेत्रात एकच महिला पोलीस नाईक कार्यरत आहे, ज्यामुळे अवैध धंदेवाल्यांनी या परिस्थितीचा फायदा घेतला आहे.

विसापूर बिटात हातभट्टी दारू, हॉटेलमध्ये अवैध दारू विक्री, मटका, जुगार, गांजा यांसारखे अनेक अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. नागरिकांना या धंद्यांना कोणाचा आशीर्वाद मिळतो आहे.? असा सवाल पडला आहे. मध्यंतरी एका महिला पोलीस नाईकाने ३२७ मधील गुन्ह्यातील जामीन नसलेल्या आरोपीसोबत औरंगाबादपर्यंत प्रवास केल्याची चर्चा झाली होती, ज्यामुळे पोलीस विभागावर संशयाचे ढग आहेत.

राजापूर बिटात १ सहाय्यक फौजदार आणि ३ हवालदार कार्यरत असताना, विसापूर दुरक्षेत्रात एकही हवालदार नसल्याने बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे नवीन बिट अंमलदार नेमणार का? तसेच, बिटात वाढत्या अवैध धंद्यांवर काय कारवाई करणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

विसापूर दुरक्षेत्रातील वाढत्या अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षा तारणासाठी बेलवंडी पोलीस ठाण्याने त्वरित नवीन बिट अंमलदाराची नियुक्ती करणे अत्यंत आवश्यक आहे. पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांची भूमिका या बाबतीत महत्वपूर्ण ठरणार आहे.

स्रोत:(पत्रकार सर्जेराव जाधव)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading