शेतकरी आणि धान्य लाभार्थींसाठी ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक – आ.बबनराव पाचपुते..

दिनांक २७ जुन २०२४,श्रीगोंदा:

नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. प्रविण देडाम आणि उपायुक्त प्रज्ञा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोच्च न्यायालयात धान्य घेत असलेले सर्व लाभार्थी पात्र आणि सत्य असल्याची माहिती सादर करण्यासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. आ.बबनराव पाचपुते यांनी सर्व लाभार्थींना ३० जून २०२४ पर्यंत ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक स्वस्त धान्य दुकानाच्या शिधापत्रिकेतून धान्याचा लाभ घेत असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थी आणि अंत्योदय लाभार्थी कार्डातील प्रत्येक सदस्याचे ई-केवायसी प्रमाणीकरण दुकानदारांनी पूर्णवेळ दुकान सुरु ठेवून पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रमाणीकरण न झालेल्या सदस्यांना धान्य वितरणातून वगळले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने वेळेत ई-केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील २०२२-२३ अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठीही ई-केवायसी आणि ग्रीव्हेन्स प्रमाणीकरण आवश्यक आहे. तलाठी कार्यालय आणि सेतू केंद्रांमध्ये याबाबतच्या स्वतंत्र याद्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी महा-ई-सेवा केंद्रात जाऊन आपल्या आधार क्रमांकावरून ग्रीव्हेन्स आणि ई-केवायसी कार्यवाही करावी. प्रमाणीकरण झाल्यावर आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, सातबारा आणि ८ अ कागदपत्रे तहसील कार्यालयाच्या आपत्ती शाखेत जमा करावीत.

३० जून २०२४ पर्यंत सर्व लाभार्थी आणि शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करून प्रशासनास सहकार्य करावे आणि संभाव्य नुकसान टाळावे असे आवाहन आमदार पाचपुते यांनी केले आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात…

Leave a Reply