दिनांक ३० जानेवारी २०२४, श्रीगोंदा:
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी रात्री २:३० वाजेनेच्या सुमारास तालुक्यातील कोथूळ येथे चार अनोळखी इसमांनी फिर्यादी आरती योगेश शेळके यांच्या राहत्या घरात अनाधिकारणे प्रवेश करून, तिचे पती योगेश सुभाष शेळके वय ३३ वर्ष झोपलेले असताना त्यांच्या गळ्यावर, हातावर, उजव्या पायावर कोयत्याने वार करून गंभीर दुखापत करून जीवे ठार केले. तसेच फिर्यादीच्या गळ्याला कोयता लावून तू ओरडली तर तुलाही जीवे ठार मारून टाकू..! अशी धमकी दिली.
या घटनेत गंभीर जखमी झालेले योगेश शेळके हे मयत झाले आहेत. पत्नी आरती शेळके यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध भादवी कलम ३०२, ४५२, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पोलीस निरीक्षक संतोष भंडारे पुढील तपास करीत आहेत. तर, घटनास्थळी पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी भेट देऊन तपासाबाबत स्थानिक प्रशासनाला सूचना केल्या आहेत.
पोलीस स्टेशनला आत्ताच नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या समोरं या खुनातील अनोळखी आरोपींचा शोध घेणे आव्हानं ठरेल..? की, नवीन कार्यक्षेत्र आणि नवीन यंत्रणेला सक्रिय करून, ते या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करतील..? हे समोर येईलच..!
स्त्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)
