राष्ट्रीय स्तर अबॅकस स्पर्धेत वाघोली अबॅकस सेंटर मधील विद्यार्थांना घवघवीत यश..

दिनांक ३१ जानेवारी २०२४, श्रीगोंदा:

पुणे येथील इंस्पायर अबॅकस अकॅडमी तर्फे आयोजित नॅशनल लेव्हल अबॅकस कॉम्पिटिशन मध्ये वाघोली सेंटरच्या विद्यार्थांनी यशस्वीरित्या सहभाग नोंदवला.

दिनांक २८ जानेवारी २०२४ रविवार रोजी अमरज्योत लॉन, अहमदनगर या ठिकाणी झालेल्या या स्पर्धेत एकूण १२४९ विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध लेव्हल नुसार घेण्यात आलेल्या या स्पर्धेत वाघोली सेंटर मधील एकूण २५ विद्यार्थांनी सहभाग नोंदवला कु.कास्वी राठोड हिने ५ मिनिटात २०३ प्रश्नाची अचूक उत्तरे सोडून स्मार्ट वॉच विजेती ठरली, तसेच चि अंशुमन रोहेला हा देखील स्मार्ट वॉच विजेता ठरला. वाघोली सेंटरमधील चॅम्पियन -४ विद्यार्थी, १ रँक – ५ विद्यार्थी, २ रँक -६ विद्यार्थी, ३ रँक – ८ विद्यार्थी व उत्तेजनार्थ २ विद्यार्थ्याची निवड झाली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अहमदनगर शहराचे कार्यसम्राट आमदार मा. संग्रामभैया अरुण (काका)जगताप पाटील हे होते. तसेच, कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री सचिन कंद (विभागीय वनअधिकारी, सामाजिक वनीकरण, अहमदनगर), मा. श्री अशोकराव कडूस (शिक्षणाधिकारी (माध्य) जि प अ नगर) आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

यासाठी अबॅकस च्या अध्यक्ष सौ अर्चना शेळके मॅडम यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले, अबॅकस च्या शिक्षिका सौं मिरा शेळके मॅडम व सर्वं यशस्वी विद्यार्थांचे इंस्पायर अबॅकस अकॅडमी पुणे व इंस्पायर अबॅकस क्लास वाघोली यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading