श्रीगोंद्यात रोम हर्षक बैलगाडा शर्यत संपन्न.. हजारो बैलगाडा शर्यत प्रेमी  उपस्थित.. पहिल्याच वर्षी मोठा प्रतिसाद..

दिनांक २२ मे २०२४ श्रीगोंदा. 

दिनांक २० मे २०२४ रोजी श्रीगोंदा जामखेड रोड वरील औटीवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीचा रोमहर्षक कार्यक्रम हजारो बैलगाडा शर्यत प्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्रीगोंदा बैलगाडा शर्यत असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये एकूण सात बक्षीसांचे वितरण करण्यात आले. यात प्रथम बक्षीस जय हनुमान ग्रुप बारामती यांना मिळाले. तर, द्वितीय क्रमांक जय हनुमान संग्राम ग्रुप यांना मिळाला, तृतीय क्रमांक श्री मोरया प्रसन्न ग्रुपला आणि चौथा क्रमांक श्री मोरया प्रसन्न अनिकेत कांचन यांना मिळाला. पाचवं बक्षीस श्रेयश आणि अनिकेत कांचन मोरगावकर यांना मिळाले. तर, सहाव बक्षीस वेद पार्थ अभिजीत वागस्कर आणि सातवं बक्षीस श्रीगोंदा येथील सद्दाम जकाते यांना मिळाले. अतिशय भव्य स्वरूपाच्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होतं.

यावेळी स्थानिक राजकीय आणि सामाजिक प्रक्रियेत सक्रिय असलेले पदाधिकारी यांनी हजेरी लावली आणि या बैलगाडा शर्यतीत विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले. 

याप्रसंगी आयोजकांच्या वतीने रोहित गोंधळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, श्रीगोंदा बैलगाडा संघटना आयोजित २०२४ मैदान आता पार पडलेले आहे. मैदान पूर्णपणे व्यवस्थित आणि शासनाच्या नियमानुसार पार पडलेले असून, यात ५१०००/- रुपयांचे प्रथम बक्षिस देण्यात आलेले आहे. तर इतर सहा बक्षिस मान्यवरांच्या हस्ते वितरण केले आहेत. त्यांसोबत विजेत्यांना ढाली आणि ट्रॉफी दिलेल्या आहेत. सदर मैदान पहायला जवळपास चार ते पाच हजार प्रेक्षक उपस्थिती होते.

या स्पर्धेत बैलगाडीची संख्या जवळपास १०० च्या आसपास होती. आपल्या मैदानाला पहिल्याच वर्षी मोठा प्रतिसाद मिळाल्याचे यावेळी आयोजकांनी नमूद केले आहे. तर, पुढच्या वर्षी भैरवनाथ यात्रेच्या तिसऱ्या दिवशी या मैदानाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे. 

आयोजकांकडून अतिशय योग्य नियोजन केले असल्याचे स्पर्धकांनी सांगितलं. जवळपास चार ते पाच हजार प्रेक्षकांनी स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी केली. तर, बक्षीस स्वरूपात ज्यांनी मदत केली. त्या सर्वांचे आभार आयोजकांनी मानलेत. श्रीगोंदा बैलगाडा असोशिएशनचे राहुल वडवकर, रोहीत गोंधळी, भाऊसाहेब औटी, महेश पोकळे, दिपक पिंपळे, गणेश पिंपळे, सागर लबडे, गणेश वडवकर, नितिन शेंडगेंसह पदाधिकाऱ्यांनी या स्पर्धेविषयी माहिती दिली आहे.

स्रोत:(आयोजित स्पर्धा)

माध्यमांना माहिती देताना आयोजक..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading