दिनांक २३ मे २०२४, श्रीगोंदा:
शहरातील सिद्धार्थनगर येथे आयोजक बौद्ध धम्म यात्रा समिती सिद्धार्थ नगर, ससाने नगर, श्रीगोंदा यांच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. याबाबत समितीचे पदाधिकारी शिवा आप्पा घोडके, डॉक्टर प्रदीप घोडके, रावसाहेब घोडके यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.
सकाळी जयंतीनिमित्त पंचशील व त्रिसरण ग्रहण करत उपस्थित मान्यवरांच्या शुभेच्छा संदेशानंतर शहरात सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ससाणे नगर, सिद्धार्थ नगर व शहरातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. श्रीगोंदा शहरात ठिकठिकाणी पदाधिकाऱ्यांनी प्रतिमांना अभिवादन करत शुभेच्छा व्यक्त केल्या. दरम्यान विद्यालयीन मुलींनी गीतांवर लेझिम नृत्य सादर केले.
दुपारी सिद्धार्थ नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनमध्ये सर्व समाज बांधवांनी एकत्रित येत अन्नदान केले. या कार्यक्रमासाठी थोर दानशूर व्यक्तिमत्व व वृद्धेश्वर बँकेचे संचालक वाडगे भाऊसाहेब यांनी धम्मदान दिले. त्यातून कार्यक्रमासाठी अन्नदान करण्यात आले.
नमुद कार्यक्रमासाठी शिवा आप्पा घोडके, रावसाहेब घोडके, डॉक्टर प्रदीप घोडके, जिवाजी घोडके, बोधाचार्य आनंद घोडके, संजय घोडके, नितीन कांबळे, भारत स.घोडके, गोरख तात्या घोडके, अरविंद पवार, अजय घोडके, बाळासाहेब घोडके, सह भारतीय बौद्ध महासभा युनिट श्रीगोंदा यांनी सहभाग नोंदवला.
सकाळी आयोजित करण्यात आलेल्या धम्मविधी व पूजा पाठ कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. यावेळी समता सैनिक दलाने आपली कवायत सादर केली. या प्रसंगी जिवाजी घोडके, प्रशांत गोरे, अनिल ठवाळ, हृदय घोडके, अमर घोडके, भागचंद घोडके, संग्राम घोडके, डॉ.अनिल घोडके, दीपक घोडके, बापू माने, संदीप उमाप, अजय घोडके, दिपक रा.घोडके, रमेश मखरे, चेअरमन अशोक घोडकेंसह बौद्ध धम्म यात्रा समिती सिद्धार्थ नगर/ससाणे नगर, व स्थानिक नागरिक, ग्रामस्थ व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्त्रोत:(आयोजित कार्यक्रम)





