मांडवगण प्राथमिक आरोग्य केंद्र डॉ. श्रीनिवास शारुक यांच्यावरील सर्व आरोप खोटे..

दिनांक २८ जानेवारी २०२४, श्रीगोंदा:

काल दिनांक २७ जानेवारी २०२४ रोजी मौजे मांडवगण गावातील प्रा.आरोग्य केंद्र मांडवगण येथे उपस्थित राहुन प्राथ.आरोग्य केंद्र मांडवगण येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीनिवास शारुक (गट अ) यांचे विरोधात जे बदनामी करण्याच्या हेतूने वर्तमान पत्रात ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्या विषयावर चर्चा सभा करण्यात आली.

सर्व नागरिकांनी आणि राजकीय पदाधिकारी, सरपंच, ग्रा.पं सदस्य, रुग्णालय कर्मचारी यांनी सर्व पुराव्याणीशी शहानिशा केली. तसेच, रुग्णांनांहि विचारपूस करण्यात आली. या समिक्षनावरून समोरं आले कि, डॉ.श्रीनिवास शारुक यांचे नाव बदनाम करणे आणि यांची बदली करण्याचे कट कारस्थान करण्यात आलेले आहे. ज्यांनी हे खोटे आरोप प्रत्यारोप केलेत ते राजकीय पदाधिकारी आणि त्यांचे सहकारी पुरावे सादर करण्यात अक्षम राहिले आहेत. असे दिलेल्या माहितीत स्पष्ट करण्यात आले असुन, त्याबाबत देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे माध्यमांना कळविले आहे.

यावेळी चर्चेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमोल बोरुडे व हेमंत लोखंडे, सरपंच चंद्रकांत सदाफुले, ग्रा.पं सदस्य, मा.सरपंच धनंजय शिंदे, डॉ.लखन लोखंडे, सिद्धार्थ घोडके, मा.रा. आंदोलन श्रीगोंदा ता. उपाध्यक्ष संदीप लोखंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading