विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे: तहसीलदार हेमंत ढोकले..

दिनांक २८ जानेवारी २०२४, श्रीगोंदा:
विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे., असे प्रतिपादन श्रीगोंद्याचे तहसीलदार मा.हेमंत ढोकले यांनी केले. ते राहुल विद्यार्थी वसतिगृह श्रीगोंदा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अग्निपंख फाउंडेशन चे अध्यक्ष बाळासाहेब काकडे होते.

ते पुढे म्हणाले सद्याच्या युगात माणसाकडे वेळ नाही. जो तो आपल्या कुटुंबामध्ये गुंतलेला आहे. अशाही परिस्थितीमध्ये बहुजन समाजाची मुले शिकले पाहिजेत. या निस्वार्थी भावनेतून राहुल विद्यार्थी वसतिगृहाचे समन्वयक सतिष ओहोळ सर, यांच्या कार्याची आपन प्रेरणा घेवून, सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करावे व स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हावे यासाठी सर्वतो परी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी अग्निपंख फाउंडेशन यांच्याकडून दोन गीजर भेट देण्यात आले.

यावेळी मा.हेमंत ढोकले साहेब पत्रकार अमोल गव्हाणे, पीटर रणशिंग, मिठू लंके (सर) सुनिलराव काळे, शुभांगी ताई लगड, विजया ताई लंके, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत चव्हाण (सर) यांनी केले. तर, आभार अधिक्षक चैतन्य गायकवाड यांनी मानले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना तहसीदार हेमंत ढोकले..

स्त्रोत:(सतिश ओहोळ)

मुलांना मार्गदर्शन करतांना अग्निपंख फाऊंडेशनचे पत्रकार बाळासाहेब काकडे..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading