एका हल्यात जीव गमवावा लागला..! दुसऱ्या हल्यात महिला गंभीर जखमी.. कोण म्हणतय.. बिबट्याला माणसाच्या रक्ताची चटक लागली..? तर, कोण म्हणतंय बिबट्या आदमखोरं झालाय..! वेगवेगळ्या अफवांणी परिसरात दहशत… ! वन विभागाची कारवाई मात्र, संथ गतीने..!

दिनांक २७ जानेवारी २०२४, श्रीगोंदा:

मागील काही दिवसांपासून तालुक्यातील अजनुज गावच्या हद्दीत बऱ्याच ठिकाणी बिबट्या पाहिल्याच्या घटनांबरोबर परीसरातच बिबट्याने हल्ला केल्याने ऊस तोडणी कामगाराच्या तीन वर्षीय मुलीला जीव गमावावा लागलेली घटना ताजीच आहे. त्याच आवास क्षेत्रात बिबट्याने पुन्हा एका महिलेवर हल्ला केलाय. ज्यात ती गंभीर जखमी झाली आहे. परीसरात बिबट्याचा वावर अनेक अफवांना वारा देत असुन, नमूद ठिकाणी या स्वापदाच्या दुसऱ्या हल्यानंतर लोकं सदर बिबट्याला माणसाच्या रक्ताची चव लागली आहे..! तर, हा बिबट्या आदमखोर झालाय..! अश्या अफवा पसरू लागल्या आहेत.

स्थानीक प्रशासन या परीसरात बिबट्याचा तपास करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलताना दिसत नाही. तसेच, त्यांनी अजनुज ग्रामस्थांना दिलेले आश्वासनं पाळण्यात ते सफसेल अपयशी झाल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे. या स्वापदाचा तपास थर्मल ड्रॉनच्या माध्यमांतून घेण्यात इतकी दिरंगाई का होत आहे.? शिवाय यासाठी लावण्यात येणारे पिंजरे व यंत्रणा काय कामाची असा सवाल विचारला जात आहे.? मागील दुर्घटनेनंतर पुन्हा या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या घटने विषयी मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील अजनूज गावच्या शिवारात मागच्या आठवड्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका तीन वर्ष्याच्या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना होऊन आठवडा देखील उलटलेला नसतानाच याच गावातील म्हसोबावाडी रस्त्यावरील कुरणामध्ये काल दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली असुन, परीसरात बिबट्याबाबत उलट सुलट चर्चा ऐकिवात येऊ लागली आहे.

जखमी झालेली महिला ही कोळसा पाडण्याच काम करत होती. ती राहत असलेल्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला. यात ती जखमी झालीय. एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा एकाच गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु, असे असताना सुद्धा वनविभाग नेमक काय करतेय.? वारंवार वनविभागाला बिबट वावरबाबत सांगुनसुद्धा वनविभाग व वन्य जीव अधिकारी याकडे डोळेझाक करीत आहेत. यात गावाकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, आतातरी वनविभागाने बिबट्या जेरबंद करण्यासाठी तात्काळ पाऊल उचलणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्त्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading