दिनांक १३ नोव्हेंबर, श्रीगोंदा
तालुक्यातील शेडगाव परिसरात रसाळ मळा रोडवर उंबर ओढा या ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याने, परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचा मुक्त संचार याठिकाणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

स्थानिक रहिवासी अनिल दळवी यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे. त्यांनी नमूद केले की, रात्री प्रवासातून घरी परतत असतांना रसाळ मळा रोडवर उंबर ओढा या ठिकाणी उस शेताच्या बांधावर बिबट्या बसल्याचे निदर्शनास आले. लागलीच दळवी यांनी चित्रीकरण करून, वनविभागाला ही माहिती कळवल्याचे सांगितले आहे. याठिकाणी दोन बिबट्या ल्याचे स्थानिक रहिवासी सांगताहेत.

बिबट्याचा वावर शेडगाव परिसरात असल्याचे समोर आल्यानंतर रसाळ मळा व शेडगाव परिसरातील आसपास ठिकाणी दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात वन विभागाने तपास करुन, पुढील उपाययोजना करावी. अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
स्रोत:(अनिल दळवी,शेडगाव)
