दिनांक १० जानेवारी २०२६,श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरालगत असलेल्या वडवकर वस्ती परिसरात आज सायंकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या बिबट्याच्या दर्शनामुळे शेतकरी आणि स्थानिक रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून, प्रशासनासह नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास अशोक वडवकर यांच्या शेतात बिबट्या आढळून आला. स्वतः अशोक वडवकर यांनी हा बिबट्या पाहिल्याचे सांगितले. बिबट्या काही वेळ शेतात वावरल्यानंतर त्याने आपला मोर्चा वडवकर वस्तीकडून भोळे वस्तीच्या दिशेने वळवला..

बिबट्याचा संचार लक्षात घेता, आसपासच्या वस्त्यांवरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः खालील परिसरात राहणाऱ्या लोकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे:
- वडवकर वस्ती
- भोळे वस्ती
- संविधान नगर
- रमाई आंबेडकर फार्म हाऊस परिसर
- पिंपळे वस्ती येथील नागरिकांना आवाहन
बिबट्याच्या वावरामुळे शेतात पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी किंवा सायंकाळच्या वेळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी समूहाने बाहेर पडावे. - “परिसरातील नागरिकांनी आपापल्या भागातील हालचालींवर लक्ष ठेवावे आणि संशयास्पद काही आढळल्यास तात्काळ एकमेकांना संपर्क साधून माहिती द्यावी,” असे आवाहन अशोक वडवकर यांनी स्थानिक रहिवाशांना केले आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
