दिनांक २७ नोव्हेंबर, श्रीगोंदा:
तालुक्यातील सुरेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सरपंच उपसरपंच व सदस्यांच्या उपस्थितीत २६ नोव्हेंबर, संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून, संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमात ग्रामस्थही उपस्थित होते.

संविधान दिनाच्या निमित्ताने सुरेगाव गावचे युवा नेते आबासाहेब शेटफळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे फोटो ग्रामपंचायतीला सप्रेम भेट दिले.

यावेळी सुरेगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान (सरपंच प्रसाद रामफळे, (उपसरपंच) संजय रोडे, (माजी उपसरपंच) गुलाब रामफळे, भगवान भालसिंग, विक्रम अडागळे, (युवा नेते) विपुल टकले, (सामाजिक कार्यकर्ते) आबासाहेब रामफळे, (मेजर) संजय ठोंबरे व सुरेगावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
स्रोत:(आबासाहेब रामफळे, सुरेगाव)
