दिनांक २७ नोव्हेंबर, श्रीगोंदा:
श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना काल दिनांक २६ नोव्हेंबर रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील सराईत आरोपी विजय राजु काळे वय २२ वर्षे, रा. उंबरगे ता. बार्शी जि. सोलापुर हा लिंपनगाव बस स्टँण्डवर संशयित रित्या फिरत आहे.

त्याबाबत पोलीस निरीक्षकांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचना देवुन, त्यास ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार सदर आरोपीस ताब्यात घेवून, त्याची झडती घेतली असता, त्याचे ताब्यात एक धारधार कोयता मिळुन आला.
त्याच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्याचे अनुशंगाने आरोपीकडे कसून चौकशी केली असता, त्याचेवर अकलुज, बार्शी, इंदापुर, बारामती, मोहोळ पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असुन, तो दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार आहे.

सदरची कारवाई मा.(पोलीस अधिक्षक) मनोज पाटील, (अप्पर पोलीस अधिक्षक) सौरभकुमार अग्रवाल, (उपविभागीय पोलीस अधिकारी) अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे (पोलीस निरीक्षक) रामराव ढिकले, (सपोनि) दिलीप तेजनकर, (सफौ) अंकुश ढवळे, (पोना) गोकुळ इंगवले, (पोकॉ) प्रकाश मांडगे, (पोकॉ) किरण बोराडे, (पोकॉ) दादा टाके, पोकॉ अमोल कोतकर यांनी केली आहे.
स्रोत:(प्रसिद्धि पत्र)
