दिनांक २८ नोव्हेंबर, श्रीगोंदा:
तालुका कार्यकारणीत सक्रिय असलेल्या पदाधिकाऱ्यांत मागील काही दिवसांपासून चालू असलेल्या आंतरिक कलहाने पक्षाची बदनामी होत आहे. याबाबत समाजातील ज्येष्ठ, प्रतिष्ठित आणि जाणकार पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन, RPI (A)च्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना समजावत राष्ट्रीय पक्ष आरपीआय ची बदनामी थांबवावी. अन्यथा, पक्षाचा त्याग करून, सामाजिक प्रक्रियेत सामाविष्ट व्हावे असे आवाहन केले.

समाजाच्या आव्हानावर सकारात्मक प्रतिसाद देत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या तालुका कार्यकारिणीतील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत त्यांनी माध्यमांना अधिकृत माहिती दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागील महिन्यात RPI पदाधिकाऱ्यांत झालेला वाद चव्हाट्यावर आला होता. या संघटनेमध्ये सक्रिय असणारे. मात्र, विचारात मतभिन्नता असणारे कार्यकर्ते वाद करून, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्याने, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राष्ट्रीय पार्टीची या वादातून बदनामी होत होती.
सदर वादातून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे आणि एकमेकांविरोधात पत्रकार परिषद घेऊन, होणारी आगपाखड यामुळे सार्वत्रिक पक्षाचे अवमूल्यन होत होते. या गंभीर घटना लक्षात घेता, वादावर पडदा टाकत, दोन्हीकडील लोकांना एकत्रित करत, सामाजिक बैठकीच्या माध्यमांतून समुपदेशन करण्यात आले. समाजातील जाणकार व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी दोन्ही गटांना समजावत यातून शांतता प्रस्थापित करण्याचा मार्ग अवलंबण्याचे आव्हान केले.

दोन्ही आरपीआयचे कार्यकर्ते असून, वाद सार्वत्रिक झाल्याने पक्षाची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे. पक्ष राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातनाम पावलेला असून, स्थानिक वादामुळे राष्ट्रीय पक्षांची बदनामी टाळावी.! अशी सुचनाही समाजातील लोकांनी केली. RPI (A) union office bearers will resign en masse ..? !!
RPI(अ) मधून बाजूला होत, सामाजिक प्रक्रियेत सक्रिय व्हावे असे आव्हान करण्यात आल्याने, सिद्धार्थ नगर व तालुका कार्यकारणी सह जिल्हा कार्यकारणीतील काही सदस्यांनी संघटनेचा सामूहिक राजीनामा देण्याचे जाहीर केले आहे. लवकरच जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांना भेटून राजीनामे सुपुर्त करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)
