कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी कारखान्याच्या १,११,१११ साखर पोत्याचे संचालकांचे हस्ते पुजन व कर्मचा-यांना १२% वेतनवाढ जाहीर.

दिनांक २८ नोव्हेंबर, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील कर्मयोगी कुंडलीकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखान्याचे १,११,१११ साखर पोत्यांचे पुजन रविवार दि.२८ रोजी संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आले.

कर्मयोगी जगताप कुकडी साखर कारखान्याने दि.२७ अखेर १२५८५० मे.टन ऊसाचे गाळप करून १०८३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कारखान्याने शनिवार अखेर ५६५८२४० युनिट वीज निर्मिती करुन, महावितरणला वितरण केली आहे.

कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार राहुल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या गळीत हंगामात नऊ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे संचालक मंडळाने नियोजन केले आहे. कुकडीचे उपाध्यक्षा ललीताताई बाळासाहेब उगले, विश्वासराव थोरात, विवेक(आबा) पवार, ॲड. सुभाषदादा डांगे, एकनाथराव बारगुजे, मनोहर वीर, सुखदेव तिखोले, सुभाष वाघमारे, धनंजय शिंदे, बाळासाहेब भोडवे, अंकुश रोडे, निवृत्ती वाखारे, प्रल्हाद इथापे, मोहन कुदांडे, उत्तम शिंदे, विनायक लगड, यांचे हस्ते १,११,१११ साखर पोत्यांचे पुजन झाले.

या वेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल जगताप म्हणाले की, स्व.कुंडलीकराव तात्या जगताप यांच्या शिकवणूकीनूसार सभासद हिताचा, काटकसरीचा, पारदर्शी कारभार करीत असून, आम सभासदांच्या व ऊस उत्पादक शेतक-यांचा कारखान्याचा कारभारावर विश्वास आहे. संचालक मंडळही ही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. यासाठी सचोटीने कारभार करीत असल्याचे सांगून कारखान्याचे या वर्षीचे गाळप स्व.कुंडलीकराव तात्या जगताप यांचे आशिर्वादाने सुरळीत चालु झाले आहे. तसेच, लवकरच कारखाना प्रतिदिन ६५०० मे.टन गाळपाचे उददीष्ट गाठेल त्यामुळे जास्तित जास्त ऊस गाळप कारखाना करणार आहे.

यावेळी साखर संघ व कामगार संघटना यांच्यात झालेल्या करारानुसार कारखान्यातील कर्मचा-यांना १२ टक्के पगारवाढ देण्याचे त्यानी जाहीर केले. या वेळी आमदार राहुल जगताप, प्र.कार्यकारी संचालक भास्कर काकडे, सुभाष कुताळ, रामदास शेटे, नारायण सरोदे, अनिल भगत, दत्तात्रय तावरे, गोपीनाथ पवार, सचीन झणझणे,‍ अनिल कराळे, कल्याणराव जगताप, विष्णुपंत जठार, दादासाहेब औटी, जगन्नाथ औटी, गंगाराम मचे, भाऊसाहेब डांगे, अनिल म्हस्के, स्वप्नील लाटे, नितीन डुबल, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.

स्रोत:(प्रसिद्धि पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading