कुकडीचे आवर्तन लवकरात लवकर मिळावे: आ.बबनराव पाचपुते..

दिनांक ३० नोव्हेंबर, श्रीगोंदा:

कुकडी लाभक्षेत्रामध्ये सध्या पाण्याची नितांत आवश्यकता असून, कुकडी धरणामध्ये ८०% म्हणजे जवळपास २३७६४ एम.सी.एफ.टी. लाईव्ह पाणीसाठा आहे. कुकडी लाभक्षेत्रा खालील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी त्यांचे हक्काचे पाणी मिळावे यासाठी कालवा सल्लागार समितीची तातडीने बैठक बोलावून लवकरात लवकर पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात यावा.

तसेच, उन्हाळी दोन आवर्तनाच्या तारखा देखिल याच बैठकीत निश्चित करण्यात याव्यात. एका आवर्तनास साधारणतः ५ टी.एम.सी. पाण्याची आवश्यकता लागते. याप्रमाणे तीनही आवर्तनाचे योग्य नियोजन करून, कुकडी डाव्या कालवा आवर्तनाबाबत सकरात्मक निर्णय घ्यावा व कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावे.!

अशा मागणीचा पत्रव्यवहार जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांच्यासोबत झाल्याचे आ. बबनराव पाचपुते यांनी सांगितले. तसेच, फोनवर देखील कुकडीच्या आवर्तनाबाबत सहकार्य करण्याची मागणी नामदार जयंत पाटील साहेब यांना केली असल्याचे पाचपुते यांनी सांगितले.

स्रोत:(संदीप नागवडे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading