दिनांक १ डिसेंबर, श्रीगोंदा:
नागवडे कारखान्याने २ हजार ६०० रुपये भाव घोषित केल्याबद्दल चेअरमनचे अभिनंदन परंतु, मागील वर्षी २ हजार ६६१ रुपये भाव घोषित करून, शासनाचा आदेश नसतांना २१७ रु. प्रती टनप्रमाणे १५ कोटी २५ लाख रुपये सभासदांना कमी भाव दिला. मग आता सभासदांची दिशाभूल करून, बाजारभावाची घोषणा मृगजळ तर ठरणार नाही ना.? असा सवाल सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे (माजी व्हाईस चेअरमन) केशव मगर यांनी उपस्थित केला आहे.
आज आपण पाहिलं तर, कारखान्याची सरासरी गाळप क्षमता ५००० मेट्रिक टन असतांना, आपला कारखाना सरासरी ५००० मेट्रिक टनाप्रमाणेच चालतो. परंतु, असे अनेक कारखाने आहेत, ज्यांची ३५०० मेट्रिक टनाची क्षमता असतांना ४५०० मेट्रिक टनाने गाळप करतात. आपली क्षमता जास्त आहे. म्हणून किमान ६ हजार मेट्रिक टनाचे रोज गाळप होण्याची आवश्यकता असतांना, चेअरमनचे कारखान्याकडे दुर्लक्ष असल्या कारणाने ते होत नाही. कारण चेअरमन साहेबांचे स्वतःच्या खाजगी कारखान्यात जास्त लक्ष आहे. असे जाणवते.
कारखाना सुरू झाल्यानंतर २६ दिवसांनी सहवीज निर्मिती चालू झाली. आपली सह वीज निर्मिती २६ मेगावॅट आहे. कारखान्याला १० मेगावॅट वीज लागते व उर्वरित वीज वितरणला विक्री होऊ शकते. परंतु, आपला कारखाना फक्त पन्नास टक्केच वीज निर्मिती करतो. मग, आपण सांगितल्याप्रमाणे सहवीज निर्मितीतून ७ कोटीचा नफा कसा होणार? याचे उत्तर चेअरमन यांनी द्यावे.
तसेच, आपण या वर्षी इथेनॉल उत्पादन चालू करणार..! अशी घोषणा केली. परंतु, आपल्याला साधी डिसलरी सुद्धा वारंवार घोषणा करून, चालू करता आली नाही. हे वास्तव आहे. मागील वर्षीच्या एफआरपी प्रमाणे उर्वरित २१७ रुपये टनाप्रमाणे सर्व शेतकरी सभासदांच्या खात्यावर आधी वर्ग केले तरच सभासद आपल्या २६०० रुपयांच्या घोषणेला खरे धरतील. अन्यथा, ही मागील सारखीच पोकळ घोषणा ठरेल. असा घणाघात मगर यांनी केला आहे.
आपला कारखाना ८६०३२ ऊसाचे गाळप करत असतांना सुद्धा आपली सरासरी रिकव्हरी ९.६० इतकी कमी का येते.? असाही सवाल मगर यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर कार्यक्षेत्राबाहेरील आपण पंचवीस ते तीस टक्के ऊस सभासदांवर अन्याय करून, आणण्याचे काम करताय. ते बंद करून, सभासदांना प्राधान्य द्यावे व सरासरी वाढवून कारखान्याचा तोटा कमी करण्याचा प्रयत्न करावा. असा सल्ला मगर यांनी दिला आहे. येत्या पंधरा दिवसात मागील एफआरपी नुसार २१७ रुपये प्रमाणे पेमेंट द्यावे. अन्यथा, शेतकरी उपोषण करतील असे मगर म्हणाले.
नैतिकता स्वीकारून राजेंद्र नागवडे यांनी चेअरमन पदाचा राजीनामा द्यावा..तीन महिन्यापूर्वी राजेंद्र नागवडे यांनी अशी घोषणा केली होती की, जर कराडला माझा कारखाना किंवा कारखान्याशी माझा किंवा माझ्या कुटुंबाचा काही संबंध निघाल्यास.? मी चेअरमन पदाचा राजीनामा देईन. चार-पाच दिवसापूर्वी त्यांच्या घरासमोर आंदोलन करून, हे सिद्ध झाले की, त्यांचा खाजगी कारखान्याशी संबंध आहे. ही नैतिकता स्वीकारून राजेंद्र नागवडे यांनी त्वरित चेअरमन पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी मगर यांनी केली आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
