दिनांक २ डिसेंबर श्रीगोंदा:
तालुक्यातील हिरडगाव येथे शिवशक्ती क्रिकेट मंडळाने दिनांक २२ नोव्हेंबर २१ रोजी घनःशाम आण्णा शेलार (प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस) व केशवभाऊ मगर (मा. व्हाॅ.चेअरमन नागवडे सहकारी कारखाना) यांच्या शुभहस्ते उद्घाटन करून, क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली.

गेल्या आठ दिवसांत ४८ संघाने आपला खेळ प्रदर्शित केला. यामध्ये प्रामुख्याने पाच मोठ्या रक्कमेची व अनेक छोटी बक्षीस देत खेळाडूंना गौरविण्यात आले. काल दिनांक १ डिसेंबर २१ रोजी श्रीगोदा/बेलंवडी यांच्यात अंतिम सामना अत्यंत चुरशीत संपन्न झाला.

प्रथम बक्षीस ३३ हजार ३३३ रुपये मा. केशवराव मगर यांच्या तर्फे जितेंद्र मगर यांच्या हस्ते बेलंवडी संघाला, व्दितिय बक्षीस राजेंद्र ठकाजी दरेकर व प्रशांत दरेकर यांच्या तर्फे २२ हजार २२२ रुपये श्रीगोदा संघाला, तृतीय बक्षीस अतुल कोठारे यांच्या तर्फे ११ हजार १११ रुपये मांडवगण संघाला तसेच, चतुर्थ बक्षीस दिपक दरेकर यांच्या तर्फे ७ हजार ७७७ रुपये चिलवडी संघाला देण्यात आले.

याचबरोबर शिस्तबद्ध संघ म्हणून, माऊली यंगर व शिवशक्ती ग्रुप हिरडगाव यांना ६ हजार ६६६ रुपये दादासाहेब बनकर यांच्या कडुन देण्यात आले.

सर्व विजयी संघाचे केशवभाऊ मगर मित्र मंडळ, श्रीगोदा तालुक्याच्या वतीने जितेंद्र मगर यांनी पुष्पगुच्छ देऊन, सत्कार केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून, युवा नेते जितेद्र मगर, दत्तात्रय भुजबळ (मा. सरपंच), बाळासाहेब शिंदे (मा. सरपंच), भालचंद्र दरेकर (मा. सरपंच), राजेंद्र दरेकर (मा. उपसरपंच), संजय ससाणे (मा उपसरपंच), सुभाष दरेकर (शाळा व्यवस्थापन समिती, अध्यक्ष), शिवशक्ती क्रिकेट मंडळाचे सर्व सदस्य व हिरडगावचे ग्रामस्थ उपस्थित होते. शांततेत व कोरोना प्रादुर्भाव नियमांचे पालन करून, सदर स्पर्धा व कार्यक्रम पार पडला.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
