दिनांक १ नोव्हेंबर २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहर आणि तालुक्यातील समस्त नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे! श्रीगोंदा शहरातील छोटू महाराज MMRD थिएटर (Chhotu Maharaj MMRD Theatre) नुकतेच सुरू झाले असून, चित्रपटप्रेमींसाठी तिकिटांवर आकर्षक सूट जाहीर करण्यात आली आहे.

श्रीगोंदा शहरातील विशिष्ट घटकांसाठी, चित्रपट पाहताना त्यांच्या तिकिटांवर थेट १० टक्के (10%) सूट देण्यात येणार आहे.

खालील नागरिकांना या सवलतीचा लाभ घेता येईल: पत्रकार (Journalists), पोलीस कर्मचारी (Police Personnel), सरकारी/खाजगी कर्मचारी (Employees), शिक्षक (Teachers), चित्रपट पाहण्यासाठी येणारे कपल्स (Couples)..

तिकीट बुकिंग Book My Show ॲपवर तसेच MMRD थिएटरच्या तिकीट खिडकीवर सुरू झाले आहे.
या सवलतीसह दाखवण्यात येत असलेला चित्रपट म्हणजे ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ (Punha Shivajiraje Bhosale). अस्सल मराठी मातीतील कथा, शेतकरी आत्महत्यांचे जिवंत वास्तव चित्रण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रकटातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन..

शहरातील प्रेक्षकांनी या आकर्षक ऑफरचा लाभ घेऊन, ‘मराठी माती, शेतकरी आत्महत्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रत्यक्ष अनुभूतीचा’ अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन थिएटर व्यवस्थापनाने केले आहे.

श्रीगोंदावासियांना आवाहन आहे की, त्यांनी या सामाजिक बांधिलकी जपणार्या चित्रपटाचा आणि आकर्षक डिस्काउंट ऑफरचा लाभ त्वरित घ्यावा.!
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
