पैशाच्या वादातून खुन: आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची तत्पर कारवाई.

दिनांक १ नोव्हेंबर २०२५ अहिल्यानगर/कर्जत:

अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील राशीन येथे पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादातून एका व्यक्तीचा खून करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या (L.C.B.) पथकाने तत्पर कारवाई करत जेरबंद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास कोर्टी व राशीन गावाच्या शिवारात ही घटना घडली. आरोपी तेजस संजय काळे (वय १९, रा. कानगुडेवाडी, ता. कर्जत) आणि मयत चंद्रशेखर रामदास जाधव यांच्यामध्ये पैशाच्या व्यवहारावरून वाद होता.

मयत चंद्रशेखर जाधव हे त्यांचा मित्र पृथ्वीराज साळुंके यांच्यासह त्यांच्या स्विफ्ट कारने (क्र. एम.एच.१६. डी.सी.८१८५) करमाळा रोडने जात असताना, आरोपी तेजस काळे याने त्याच्या स्विफ्ट कारने (क्र. एम.एच.१२.एन.जे.५७२०) त्यांचा पाठलाग केला. आरोपीने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मयताच्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत चंद्रशेखर जाधव यांचा मृत्यू झाला, तर पृथ्वीराज साळुंके हे जखमी झाले.

https://www.amazon.in/dp/B0FMY3SQPJ/ref=cm_sw_r_as_gl_apa_gl_i_8VQQAFPG1WKA5JC5JPGV?linkCode=ml1&tag=nirbhidkalam-21&linkId=016a0cd6a7e88d422011a717a83ebca7

या घटनेप्रकरणी सुभाष शंकर जाधव (वय ३६, रा. झरे, ता. करमाळा) यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, कर्जत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१), ११८(२), १२५(१), १२५(B), २८१, ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.


या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत, मा. श्री. सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांना आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले.

https://amzn.to/3WyVsDG

पो.नि. कबाडी यांनी तातडीने पो. अंमलदार रमेश गांगर्डे, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल पोपट, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे आणि चालक अरुण मोरे यांचे एक विशेष पथक तयार करून आरोपीच्या शोधासाठी रवाना केले.

https://amzn.to/47i5P4S

पथक आरोपीचा शोध घेत असताना, दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की, आरोपी तेजस संजय काळे हा त्याच्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून अहिल्यानगर ते मिरजगाव रोडने जात आहे.

https://amzn.to/3JbocPO

माहिती मिळताच पथकाने त्वरीत बनपिंप्री गावच्या शिवारात रोडवर सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने त्याचे नाव तेजस संजय काळे असल्याचे सांगितले आणि गुन्हा करताना वापरलेली गाडी (पांढऱ्या रंगाची स्विफ्ट) तिचीच असल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीकडून एकूण रु. ५,३०,०००/- किंमतीची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार आणि तीन वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल हँडसेट जप्त केले आहेत. ताब्यात घेतलेला आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासकामी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आला असून, कर्जत पोलीस स्टेशन या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading