दिनांक १७ ऑक्टोबर २०२५,श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नगर रोड लगत छोटू महाराज एजन्सीच्या माध्यमातून ‘MMRD‘ या अत्याधुनिक थिएटरचा दिमाखदार शुभारंभ करण्यात आला आहे.

दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी आमदार विक्रम पाचपुते आणि घनश्याम आण्णा शेलार यांच्या शुभहस्ते तसेच पत्रकारिता, राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.

श्रीगोंदा शहरातील चित्रपट आणि मनोरंजनप्रेमींसाठी हे MMRD थिएटर मनोरंजनाची एक पर्वणी ठरणार असून, ‘पैसा वसूल’ आनंद देईल असा विश्वास अनेक मान्यवरांनी शुभेच्छापर बोलताना व्यक्त केला.

व्यवस्थापक आणि थिएटरचे मालक मोहसीन शेख आणि मंगेश जठार यांनी श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील चित्रपट रसिकांसाठी अत्यंत सुसज्ज आणि वातानुकूलित थिएटरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

- या थिएटरमध्ये प्रशस्त आणि ॲडजस्टेबल चेअर (adjustable chairs)…
- मनोरंजक पदार्थांसाठी कॅफे बार…
- चित्रपट पाहण्याचा उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी उच्च गुणवत्तेची DTS सराऊंड साऊंड सिस्टिम (DTS Surround Sound System)…
- दर्जेदार स्क्रीन…
- याव्यतिरिक्त वाढदिवस (बर्थडे) आणि मुलांसाठी स्वतंत्र लॉन्सची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
- चित्रपट प्रेमींना त्यांच्या सोयीनुसार तिकीट बुक करता येणार आहे.
- ऑनलाईन बुकिंग: Book My show या मोबाईल ॲपद्वारे सिल्वर, गोल्डन आणि प्लॅटिनम अशा तीन टप्प्यातील बैठक व्यवस्थेतून चित्रपटाचा आनंद घेता येईल.
- ऑफलाइन बुकिंगवर मोठी सूट (डिस्काउंट): MMRD व्यवस्थापनाने ऑफलाइन तिकीट बुकिंगवर १० ते १५ टक्क्यांचा भरघोस डिस्काउंट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
- दिवाळी निमित्त ग्रुप बुकिंग डिस्काउंट: खास दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, ऑफलाइन ग्रुप बुकिंग करणाऱ्यांसाठी विशेष सवलत आहे. कमीत कमी पाच लोक तिकीट बुकिंग करून या डिस्काउंटचा फायदा घेऊ शकतात, असे मोहसीन शेख यांनी सांगितले आहे.
MMRD थिएटरमुळे श्रीगोंदा शहरातील मनोरंजन क्षेत्राला नक्कीच नवी उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

स्रोत:(उद्घाटन सोहळा)

Advertise…
