नाहाटांवरील वाढत्या ॲट्रॉसिटींनी तालुक्यात खळबळ; “अधिकाऱ्याची जात माहीत नसताना गुन्हा कसा..?”राजकीय षडयंत्र की आणखी काही..? मागासवर्गीय बांधवांकडून सवाल.. नाहाटांवरील ॲट्रॉसिटी ‘काँट्रोवर्सी’त..!

श्रीगोंदा, १८ ऑक्टोबर २०२५: श्रीगोंदा:

तालुक्याच्या राजकारणात आणि समाजकारणात प्रदीर्घ अनुभव असलेले, राज्य बाजार समितीचे अध्यक्ष आणि सामान्य नागरिकांना मदत करणारे ज्येष्ठ राजकीय नेते बाळासाहेब नाहाटा यांच्यावर वारंवार दाखल होत असलेल्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमुळे तालुक्यात मोठी ‘काँट्रोवर्सी’ निर्माण झाली आहे.

या ॲट्रॉसिटी प्रकरणांमागे राजकीय हेतू असल्याचा आणि सूडभावनेतून हे सगळं केलं जात असल्याचा संशय सर्वसामान्य मागासवर्गीय बांधवांमध्ये उमटू लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादातून नाहाटांवर मागे एकदा ॲट्रॉसिटी दाखल झाली होती. त्यानंतर बेलवंडी पोलीस स्टेशन आणि पुन्हा एक श्रीगोंदा पोलिसात असे गुन्हे दाखल झाल्याचे बोलले जात आहे.

लोणीतील विजेच्या प्रश्नासाठी अधिकाऱ्यांशी हुज्जत, ॲट्रॉसिटीचा गुन्हा.?
बाळासाहेब नाहाटा हे नेहमीच मतदार राजा आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून काम करतात. विकासकामे आणि मूलभूत सुविधांसाठी ते अनेकदा अधिकाऱ्यांशी झगडताना तालुक्याने पाहिले आहे.

नवीनतम प्रकरणात, लोणी गावातील सर्वसामान्य नागरिकांचा सुमारे एक महिन्यापासूनचा विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी तेथील विविध समुदायातील पीडित लोकांचे प्रतिनिधित्व म्हणून बाळासाहेब नाहाटा यांनी अधिकाऱ्यांसोबत जनहिताच्या कामासाठी हुज्जत घातली. याच घटनेनंतर त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला.

प्रशासकीय अधिकाऱ्याची जात माहीत नसताना गुन्हा कसा? असे अनेक या प्रकरणांमध्ये अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत:

जातीची माहिती नसताना गुन्हा: ज्या अधिकाऱ्यासोबत नाहाटा यांनी संवाद साधला, त्या अधिकाऱ्याची जात श्रीगोंदा तालुक्यातील पुरोगामी आणि मागासवर्गीय समाजालाही माहीत नाही. मग, नाहाटा यांना ती कशी माहीत झाली? प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्याला कोणती जात नसते, हे सर्वमान्य असताना, जातीचा उल्लेख कसा झाला?

कट रचल्याचा संशय: ही घटना घडली तेव्हा बाळासाहेब नाहाटा संबंधित अधिकाऱ्याला बोलत असताना, त्याचे नियोजनबद्ध व्हिडिओ चित्रीकरण करून गुन्हा दाखल करण्याचा कट रचण्यात आला का, अशी शंका व्यक्त होत आहे.

धमकीचा आरोप: घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांसमोरील व्हिडिओ क्लिप तयार झाल्यानंतर “ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करू,” अशी धमकी काही लोकांनी दिल्याचे बोलले जात आहे.

जनहिताच्या कामासाठी अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालणे आणि त्यावर, समोरील अधिकारी/कर्मचारी कोणत्या जातीचा किंवा धर्माचा आहे हे माहीत नसताना, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता श्रीगोंद्यातील सर्वसामान्य नागरिक आणि सामाजिक पदाधिकारी उपस्थित करीत आहेत.

या वारंवारच्या गुन्ह्यांमागे राजकीय षड्यंत्र असल्याचा गंभीर आरोपही काही जणांकडून करण्यात येत आहे, ज्यामुळे नाहाटांवर दाखल होत असलेल्या ॲट्रॉसिटींवर तालुक्यात मोठी कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण झाली आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading