श्रीगोंदा शहरातील विवीध भागांसह प्रशासकिय कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी…

श्रीगोंदा दिनांक,१४ एप्रिल :
श्रीगोंदा शहरातील विविध भागांत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती प्रतिमा पूजन करून,उपस्थित समाज बांधवांना शुभेच्छा संदेश देत साजरी करण्यात आली आहे. इंदिरा नगर येथे तरुणांच्या पुढाकाराने बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करीत,महमानवांच्या जीवनचरित्राचा उल्लेख करीत सर्व समाजाला समतेचा आणि एकतेचा संदेश देण्यात आला आहे.याठिकाणी टिळक भोस, विजय गायकवाड(सर),अमित हरिहर,संजय सावंत,सचिन झगडे (सर),राजेंद्र पोकळे,सुनिल छतीसे उपस्थित होते.तर,राहुल शिंदे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
याच बरोबर सिद्धार्थनगर येथील स्मारकात बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उस्थाहात साजरी करण्यात आली.यावेळी सिद्धार्थ नगर या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले.या कार्यक्रमात थर्माकोलचा भव्य स्टेज बनवून त्यात महापुरुषांच्या प्रतिमा दर्शनासाठी ठेवण्यांत आल्या.
यावेळी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी उपस्थित समाज बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देत,मार्गदर्शन केले.त्यांनी महामानवांच्या जीवनचरित्राचा व जीवन संघर्षाचा उल्लेख केला.विशेषतः समाजातील सामान्यानां डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिक्षणाच्या अधिकाराचे महत्व विशद केले.बाबासाहेबांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामन्यातुन असामान्य पद मिळवले,असल्याने समाजानेही शिक्षणाच्या प्रवाहत येणे काळाची गरज असल्याचे,जाधव यांनी यावेळी उपस्थित बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले आहे.शिक्षणाने माणसाची कुवत सुधारते असे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केले आहे.आणि आपण सर्वांनी त्याचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन गौतम घोडके,हृदय घोडके,दिपक घोडके,भारत घोडके,संग्राम घोडके,धरम घोडके,भगवान घोडके,लक्ष्मण घोडके यांनी केले.तर या कार्यक्रमात सर्व समाज बांधव व पो.कॉ.अविनाश ढेरे, नगरसेविका सौ.सोनाली हृदय घोडके, नगरसेवक निसार कुरेशी,मुख्याध्यापक मोटे,श्रीपाद कुलकर्णी, भाऊसाहेब गोरे,समीर गांधी,अविनाश दीक्षित,केंद्रप्रमुख गजानन ढवळे(सर),सुनिल ओहोळ,कांतीलाल कोकाटे,शेळके मॅडम सह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
सामजिक ठिकानां बरोबरच ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त श्रीगोंद्यातील प्रसशासकीय कार्यालयात प्रतिमेचे पूजन करण्यात आले आहे. यात श्रीगोंदा बस आगारात(आगार व्यवस्थापक)प्रवीण शिंदे,(कार्यशाळा अधीक्षक)प्रशांत होले,(वाहतुक निरीक्षक)शिंदे,चालक शिंदे,शिपाई रमेश धाडगे,वाहक चोबे,मेकॅनिक आबा ससाणे सह श्रीगोंदा आगारातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालयात जयंतीचे औचित्य साधून रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.यावेळी सतिष ओहोळ (सचिव) भारतीय बौद्ध महासभा,लक्ष्मण काशीनाथ घोडके,संग्राम घोडके,डॉ.राजुळे,राजेश मिश्रा,सुधाकर घोडके,धरम घोडके,भगवान घोडके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये पी.आय.दौलतराव जाधव यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.यावेळी पो.कॉ. अविनाश ढेरे,पो.स.ई.गावित साहेब सह महिला कर्मचारी उपस्थित होते.
वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात आर.एफ.ओ.अस्विनी दिघे मॅडम,यांच्या हस्ते बाबासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी,वनपाल रवी तुपे,वनपाल प्रवीण अवचर, चव्हाण सह कर्मचारी उपस्थित होते.

श्रीगोंदा बस आगार 
वनपरिक्षेत्र कार्यालय ,श्रीगोंदा…

सिद्धार्थनगर,श्रीगोंदा..

img-20190414-wa00871210456298490970237.jpg

इंदिरानगर,श्रीगोंदा..

पोलीस स्टेशन ,श्रीगोंदा…

श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय, येथील डॉक्टर व कर्मचारी…
 

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading