दिनांक २६ जुलै, हिरडगाव/श्रीगोंदा:
तालुक्यातील हिरडगाव येथील रहिवासी भास्कर आबासाहेब भुजबळ यांच्या घरी अज्ञात चोरांनी चोरी करून ६,८२,१६७/- एकूण रुपये व सोनं असा ऐवज चोरून नेला आहे.सदरील घटना दिनांक २५ जुलै रोजी रात्री १२:०० ते दिनांक २६ जुलै रोजी पहाटे २:३० वाजनेच्या दरम्यान घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पीडित भास्कर भुजबळांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमांच्या विरोधात भादवि कलम ४५७ व ३८० नुसार घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
एस. डी. पी. ओ. संजय सातव (कर्जत भाग कर्जत), पो. नि. दौलतराव जाधव (पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन) यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. तर पोलीस उप निरीक्षक अमित माळी हे पुढील तपास करीत आहेत.
(स्रोत: भास्कर भुजबळ यांची फिर्याद व मिळालेल्या माहिती)
