दिनांक २६ जुलै, अहमदनगर:
मुख्यालय अहमदनगर येथे कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार श्री. आबासाहेब सुखदेव गारुडकर यांचे काल कोरोना संसर्गामुळे दुःखद निधन झाले आहे. याविषयी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची पोलीस प्रशासनात ओळख होती. त्यांच्या जाण्याने पोलीस प्रशासनाने आदरांजली वाहिली असून, कुटुंबातील लोकांना दुःखात सावरण्यासाठी प्रार्थना केली आहे.
श्रीगोंदा पोलीस स्टेशनला ते पोलीस हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. साधारण तीन वर्षे त्यांनी श्रीगोंदा कार्यक्षेत्रात आपले कर्तव्य पार पाडले आहे. श्रीगोंद्यात काम करत असताना ते जनरल ड्युटी बजावत होते. त्यांच्या मृत्यू वर श्रीगोंदा पोलीस स्टेशननेही श्रद्धांजली वाहिली आहे.
(स्रोत:अहमदनगर पोलीस व मिळालेली माहिती)
