दिनांक १७ एप्रिल रोजी भगवान महावीर यांच्या २६१९ व्या जन्मदिनां निमित्ताने श्रीगोंदा शहरात सर्व जैन बांधवांच्या पुढाकाराने,भगवान महावीरांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंती उत्सवात सर्व समाज बांधव उपस्थित होते.
सकाळी १० वाजता जैन स्थानकात,धार्मिक विधी संपन्न झाला.यावेळी पुणे येथील विचारवंत व अभ्यासक अशोक देशमुख यांचे “हसत खेळत तणाव मुक्ती”या विषयावर व्याख्यान झाले.यानंतर श्रीगोंदा नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक समीर बोरा व महावीर पटवा यांनी भगवान महावीरांचा जीवन चरित्राचा उलगडा करीत त्यांच्या कार्यकाळातील घटनांचा आढावा घेतला. अडीज हजार वर्षांनंतरही या युगपुरुषांचे विचार आणि तत्वज्ञान अस्तित्वात आहेत.त्यांचे सिद्धांत आजही सामान्य माणसाच्या सुख दुःखात महत्वाचे ठरत आहेत.असेही यावेळी बोलतांना त्यांनी नमूद केले आहे.
या कार्यक्रम स्थळी जैन स्थानकात सतीशशेठ पोखरणा,अतुल मेथा,आनंद कटारिया, धनेशशेठ गूगळे, निलेश भंडारी,संतोष भंडारी,राजू शेठ गुंदेचा,दिलीपशेठ मेहथा,लौकिक मेहथा,सह पत्रकार रामेश गांधी व समाज बांधव उपस्थित होते.
महवीरांच्या जयंतीचे औचित्य साधत सदभावना आनंद सेवा मंडळा तर्फे या दुष्काळी परिस्थिती ला लक्षात घेता,वन्य जीवांना वडाळी वनक्षेत्रात असलेल्या पाणवठ्यावर,पाण्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळी सदभावना आनंद सेवा मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
सांयकाळी ६:०० वाजता भगवान महवीरांच्या प्रतिमेची श्रीगोंदा शहरांतुन भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सर्व समाज बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देत महवीरांचा जयघोष केला.शिवाय सर्वांनी दांडियाचा आनंद लुटला.
मिरवणूक शनिचौक येथे आल्यावर परिक्रमा शिक्षण संस्थेचे पदाधिकारी,यांनी जैन बांधवांसह सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नगराध्यक्ष,उप नगराध्यक्ष,शहाजी खेतमाळीस,(पोलीस निरीक्षक)दौलतराव जाधव,यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित राहिले. झेंडा चौक परिसरात श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप, बाबासाहेब भोस सह इतर मान्यवर उपस्थित होते. संपुर्ण जयंतीचा कार्यक्रम अतिशय शांतपणे पार पडला.
वन्यजीवांना पाण्याची व्यवस्था करतांना सदभावना आनंद सेवा मंडळाचे पदाधिकारी…(छाया :अमर घोडके)