श्रीगोंदा तालुक्यातील टँकर चे उदभव असणाऱ्या तलावांची तहसीलदारांकडून पाहणी..

श्रीगोंदा दिनांक १८ मे:

श्रीगोंदा तालुक्यासाठी नुकतेच कुकडीच्या डाव्या कालव्याचे उन्हाळी हंगामासाठी असलेले,पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.त्यातून श्रीगोंदा तालुक्यातील टँकर चे उदभव असणारे तलाव तसेच पाणी पुरवठा योजने लगत असणारे उदभव भरण्याचे काम सुरू आहे.सदरचे आवर्तन हे पिण्याचे पाण्यासाठी सोडण्यात आले आहे.त्यानुसार,ज्याठिकाणी टँकर चे उदभव असणारे तलाव भरलेले आहेत,त्याठिकाणी कुठल्याही प्रकारचा पाण्याचा अवैध उपसा होऊ नये.यासाठी,(तहसीलदार श्रीगोंदा)महेंद्र माळी यांनी भावडी तलाव तसेच घोडेगाव,आढळगाव तलावांची समक्ष पाहणी केली.कारण सदरचे पाणी हे पावसाचे आगमन होईपर्यंत पिण्यासाठी पुरविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे,सदर ठिकाणी अवैध पाणी उपसा झाल्यास,संबधितांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.
सदरची पाहणी करतांना(गटविकास अधिकारी)प्रशांत काळे,तसेच (मंडळ अधिकारी)जगताप,(विस्तार अधिकारी) साळवे,(तलाठी)साबळे,काळे तसेच ग्रामसेवक उपस्थित होते.अवैध पाणी उपसा होणार नाही.यासाठी संबधीत तलाठी व ग्रामसेवक यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
img-20190517-wa00325741645574598853198.jpg
पाहणी करतांना तहसीलदार महेंद्र माळी साहेब व प्रशासकीय अधिकारी.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading