पाझर तलावातील विहीरी व बोअरवेलचे अतिक्रमणे काढण्यासाठी तहसीलदारांना देऊळगाव ग्रामस्थांचे निवेदन…


श्रीगोंदा(देऊळगाव गलांडे)दिनांक२७ मे:

श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव गलांडे व शेजारील भांनगाव तशेच घुगलवडगाव या दोन गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा व येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा.नमूद पाझर तलावात काही सत्तेचे अधीन असलेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी केलेले विहिरी व बोअरवेलचे अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे.यासाठी,आज दिनांक २७ मे रोजी दुपारी देऊळगाव गलांडे,भानगाव व घुगलवडगाव या गावातील ग्रामस्थांनी (श्रीगोंदा तहसीलदार)महेंद्र माळी(महाजन) यांना नमूद मागन्यांचे निवेदन सादर केले आहे.
    सदर निवेदनात पीडित ग्रामस्थांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला आहे . त्यांनी या निवेदनापूर्वी अनेक वेळा (मुख्यकार्यकारी अधिकारी ) जिल्हापरिषद,(जिल्हाधिकारी) अहमदनगर,(लघु पाटबंधारे विभाग)अहमदनगर  (तहसीलदार)श्रीगोंदा,(ग्रामसेवक)देऊळगाव,भानगाव,घुगलवडगाव इत्यादी कार्यालयांच्या संबंधित अधिकारी व प्रशासकीय कर्मचारी यांना निवेदनाद्वारे पीडित ग्रामस्थांच्या भावना व अडचणी पोहचवल्या. मात्र त्यांवर आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पाझर तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्याने,भानगाव,देऊळगाव व घुगलवडगाव या गावातील पाण्याचा विषय गंभीर झाला असून, गावचा पाणी पुरवठा यामुळे प्रभावित होत आहे.या ठिकाणी तलावात विहिरी व बोअरवेलचे अतिक्रमण करणारे सर्व राजकीय भूमिकेतील लोक असल्याने,प्रशासन कारवाई करण्यास कुचराई करीत असल्याचा येथील सामान्यांतून सूर येत आहे.
   येथे अतिक्रमण करणारे जरी दिग्गज राजकारणी असले.तरी हे आंदोलन सामजिक विषयावरील असल्याने,सामाजिक भूमिकेतच आंदोलन करणार असल्याचा येथील ग्रामस्थांनी निश्चय केला आहे. नैसर्गिक साधन संपप्ती वर सर्वांचा अधिकार असतांना काही लोकांच्या आग्रहास्तव व तलावातील अतिक्रमणांमुळे संबंधित गावातील पीडित लोकांना यापूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करीत,तरडगव्हान गावच्या हद्दीपर्यंत पायपीट करावी लागल्याचे सर्वांना ज्ञात आहे.प्रशासनाने दखल न घेतल्यास,लवकरच याविषयी स्थानिक पातळीवर पीडित ग्रामस्थांची नियोजन बैठक घेण्यात येणार असल्याचे,निवेदन कर्त्यांचे म्हणणे आहे.पाण्यासाठी या वरिष्ठ लोकांकडून पीडितांची पिळवणूक व प्रशासनाकडून फसवणूक होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
    प्रशासनाने याप्रकरणी लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करण्याचे पत्र या ग्रामस्थांना दिले आहे. अश्या प्रकारचे अतिक्रमण काढण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांना असल्याचे ग्रामसेवकांनी दिलेल्या उत्तरात प्रशासनाने त्यांची भूमिका नमूद केली आहे. स्थानिक ग्रामपंचायतीने अनेक वेळा अतिक्रमण काढण्याचा ठराव संमत केला असतांना,कारवाई शून्य असल्याने.पीडित येणाऱ्या काही दिवसांत श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याच्या पावित्र्यात असल्याचे स्पष्ट होत आहे. श्रीगोंदा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर संतोष विष्णू गायकवाड,अजित अशोक गायकवाड,सुरेश हरिभाऊ गलांडे,लालचंद शिंदे,अजित कांबळे,नानाभाऊ कुदांडे, राजेंद्र पोकळे(प्रहार अपंग संघटना),नितीन रोही(प्रहार संघटना),भाऊसाहेब पुराणे(प्रहार संघटना),अनिल कचरू दांगडे, जालिंदर गायकवाड, छगन श्रीराम, संपत श्रीराम यांच्या सह शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading