जिल्ह्यासह परजिल्ह्यातील मोटारसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात १७ मोटारसायकली जप्त…

श्रीगोंदा दिनांक १८ जून:
श्रीगोंदा तालुक्यात काही तरुण वेगवेगळ्या गाड्या बाळगत मौज करीत असल्याची माहिती,श्रीगोंदा पोलिसांना मीळाली. त्यावरून (पोलिस उपविभागीय अधिकारी) संजय सातव यांच्याकडे श्रीगोंदा (पोलीस निरीक्षक) यांनी याप्रकरणी माहिती दिली.त्यानंतर,श्रीगोंदा पोलिसांच्या तपास पथकाने देऊळगाव गलांडे येथील तुषार रखमाजी पवार यास सापळा लावून ताब्यात घेतले.त्याच्याकडे चौकशी केली असता, विना क्रमांकाच्या दोन मोटोरसायकल त्याच्याकडे असल्याचे त्याने कबूल केले .पोलिसांनी त्या दोन मोटरसायकल हस्तगत केल्या असून ,त्याच्याकडून इतर साथीदारांचे नावे पोलिसांना समजली. या टोळीने कर्जत,श्रीगोंदा,शिरूर,पारनेर,टेम्भूर्णी इत्यादी ठिकाणी मोटोरसायकली विकल्याचे समजले .तुषार पवार याचे साथीदार महेश भाऊसाहेब कदम,वय २२ वर्षे व राहुल सुरेश कदम २३ वर्षे दोघे राहणार बारडगाव दगडी तालुका कर्जत,महेश उत्तरेश्वर गायकवाड वय २४ राहणार शेवरे तालुका म्हाडा,सागर बाळासाहेब डांगे वय वर्षे २० राहणार वडाळी तालुका श्रीगोंदा,विक्रम आप्पासाहेब जगताप वय २२ वर्षे राहणार शिंदा तालुका कर्जत,व अभिषेक हनुमंत मिसाळ वय १९ वर्षे राहणार सोनार आळी,शिरूर यांच्याकडे श्रीगोंदा पोलिसांनी सखोल चौकशी केली असता,आम्ही तुषार पवार याच्या बरोबर गाड्या चोरून विकत असल्याचे कबुली त्यांनी दिली आहे .त्यांच्याकडून १५ मोटोरसायकली अश्या एकूण १७ मोटोरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
तालुक्यात अजून असे गाड्या चोरीचे प्रकार उघड होण्याची शक्यता,(पोलीस निरीक्षक)दौलतराव जाधव यांनी व्यक्त केली आहे. सदरची कारवाई (पोलीस अधीक्षक) इशू शिंधु ,(अप्पर पोलीस अधीक्षक) सागर पाटील ,(उपविभागीय अधिकारी) संजय सातव,(पोलीस निरक्षक) दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे (पोलीस उप निरीक्षक) सोमनाथ कर्णवर ,पो.हे कॉ .अंकुश ढवळे ,पो.कॉ.किरण बोराडे ,दादासाहेब टाके,रवी जाधव,यांचे तपास पथकाने केली असून,या गुन्ह्याचा पुढील तपास रोहिदास झुंजार करीत आहेत.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading