वीरशैव वाणी,वीरशैव गवळी समाजासह महानुभाव पंथीय समाजबांधवाचे दफनभूमी व विविध मागण्यांसाठी आंदोलन …

श्रीगोंदा दिनांक १८ जून :
श्रीगोंदा शहरात वास्तव्यास असणाऱ्या वीरशैव वाणी,वीरशैव गवळी समाज बांधवांसह महानुभाव पंथीय समाजाच्या मृत व्यक्तींचे अंत्यविधी करण्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमी आहे. येथे गेल्या चार दशकांपासून समाजाच्या लोकांचे अंत्यविधी विना अडथळा होत आले आहेत. मात्र अलीकडच्या काही वर्ष्यात येथे अंत्यविधीसाठी जागेचा वाद काही लोक हक्क दाखवीत करू लागले आहेत.ज्या मुळे अंत्यविधीवेळी समाजाला प्रशासनाच्या उपस्थितीत अंत्यविधी करावा लागत आहे. अंत्यविधीसाठी होणार विलंब व वाद हा त्या मृतदेहाची अवहेलनाचं म्हणावी लागेल. दफनभूमी संदर्भात चालू असलेला हा युक्तिवाद थांबवावा .आणि अधिकृतपणे किंवा नोंद असल्याप्रमाणे दफनभूमीची नोंद कायम करीत ,मृतदेहांची अवहेलना थांबवावी. स्मशानभुमी जागेतील व शेजारील गटातील सर्व खाणाखुणा प्रशासनामार्फत नकाशात अंतर्भूत करण्यात याव्यात.यासाठी,आज दिनांक १८ जून रोजी सकाळी सर्व वीरशैव वाणी,गवळी व लिंगायत समाजामार्फत श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
या आंदोलनात नमूद समाजाचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले आहेत. यापूर्वी केलेल्या आंदोलनास प्रशासनाने साधारण उत्तर देत अपेक्षित कारवाई केली नसल्याने,आज पुन्हा भविष्यातील अडचण उद्भवू नये यासाठी,हे आंदोलन चालवण्यात आले असल्याचे,आंदोलन कर्ते मुरलीधर होणराव (जेष्ठ नागरिक)व भाजप ओबिसी सेल चे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय हिरनवाळे यांनी आंदोलन स्थळी माध्यमांना सांगितले आहे. चाळीस वर्षांपासुन याठिकाणी अंत्यविधी होत आले आहेत. साधारणपणे १०० च्या आसपास मृतदेह आजपर्यंत याठिकाणी दफन करण्यात आले आहेत. अधिकृत दस्तावेजांच्या आधारे दफनभूमी ची नोंद करण्यासाठी समाज बांधवानी पाठपुरावा केला असून,सन २००५ साली जिल्हाधिकारी यांनी येथे दफनभूमीचा नकाशा तयार करण्याच्या प्रशासनास सूचना केल्या.त्यानुसार नमूद गट वगळता लिंगायत समाज दफनभूमी नकाशात अंतर्भूत करण्यात आले. ती नोंद २०१६ सालापर्यंत उताऱ्यावर नमूद राहिली.मात्र,त्यानंतर त्यात हस्तक्षेप करीत नोंद अनाधिकार व गैरसंविधानिक पद्धतीने उडविण्यात आल्याचे आंदोलकर्त्यांचे म्हणणे आहे.
श्रीगोंदा येथील गट क्रमांक २३९४ चा मोजणी वस्तुस्थिती दर्शक नकाशा त्वरित मिळावा. सदर गट व गट लगत असणाऱ्या सर्व खुणा खंडोबा मंदिर, त्यापुढील जुन्या समाध्या,विद्युत खांब,स्मशानभूमी जागेतील समाधी इत्यादी बाबी नमूद नकाशात अंतर्भूत कराव्यात. सदर गटामध्ये येणारे सर्व व्यावसायिक शेड,छोट्या टपऱ्या,पूर्वीचा नदीला मिळणारा ओढा नकाशात दाखवण्यात यावा. या आणि विविध मागन्यांसाठी नमूद समाजबांधवानी प्राणांतिक उपोषण सुरु केले आहे.
या गटातील कुळ खेतमाळीस यांनी काही संलग्न लोक हाताशी धरून,मोजणी अधिकाऱ्यांच्या संगनमताने २०१६ ला समाजबांधवाना कोणतीही मोजणीची सूचना न देत,मोजणी करून २००५ च्या जिल्हाधिकारी यांनी केलेल्या सूचनांना न जुमानता,वस्तुस्थिती दर्शक नकाशा बदलून स्मशानभूमी नकाशावरून हटवून,खोटा नकाशा बनविल्याचा आंदोलकांनी आरोप केला आहे. राजकीय दबाव वापरून प्रशासनास हाताशी धरले जात असल्याचेही,त्यांचे म्हणणे आहे. या आंदोलनात पत्रकार अशोक होनराव,माणिक हिरनवाळे हिरामण हिरनवाळे ,रवी दंडनाईक ,दीपक हिरणवाळे ,बाप्पू हिरनवाळे ,विठ्ठल लंगोटे,रतीशेठ आंधळकर,बाळासाहेब हिरनवाळे ,सह समाजबांधव उपस्थित होते.
या आंदोलनाच्या अपरोक्ष खेतमाळीस यांनीही त्यांच्या मांगण्यासाठी समोरच आंदोलन केले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading