पाचवीच्या विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करून विद्यालय मध्ये स्वागत..
श्रीगोंदा दिनांक १७ जून:
आज पाचवीच्या विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करून महादजी शिंदे विद्यालयामध्ये हार्दिक स्वागत करण्यात आले.त्यांना त्यांची जोपासना करण्याची प्रेरणा देण्याचे काम विद्यालयाच्या माध्यमातून चालू आहे. रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह वटवृक्ष असलेलं विचार निसर्गाप्रती आहे.तो निसर्गाप्रती असणारा विचार रयत शिक्षण संस्थेच्या महादजी शिंदे विद्यालयाच्या माध्यमातून आज प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना आंब्याच्या वृक्षांचे वाटप करून त्यांना वाढवण्याची त्यांची काळजी घेण्याची भूमिका विद्यार्थ्यांना समजावून देण्यात आली.जेणे करून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास त्या माध्यमातून कमी करता येईल… या उपक्रमाचे कौतुक स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब भोस,प्रा.तुकाराम दरेकर,रवीशेठ दंडनाईक, राजशेठ गोरे,डॉ.घोडके यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम कन्हेरकर सर यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोडखे सर यांनी केले.