पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्फत स्थानिक बँका व वित्त संस्थांना सुरक्षा व दक्षता संदर्भात मार्गदर्शक सूचना....

श्रीगोंदा दिनांक २१ जून :
नाशिक व जळगाव येथे झालेल्या बँक दरोडा घटनेच्या अनुषंगाने,श्रीगोंदा कार्यक्षेत्रात दक्षता घेण्यासाठी दिनांक २० जून रोजी सकाळी ११:०० वा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पो.नि.श्री दौलतराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शना खाली,श्रीगोंदा शहरातील सर्व बँका व पतसंस्था तसेच सोने तारण ठेवणाऱ्या संस्था चालक, व्यवस्थापक यांची बैठक घेत,त्यांना सतर्कतेच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन करीत सूचना देण्यात आल्या आहेत.उच्च प्रतीचे cctv कॅमेरे तसेच सशस्त्र सुरक्षा गार्ड ठेवन्यासंदर्भात पोलीस निरीक्ष दौलतराव जाधव यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मार्फत उपस्थितांना महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत.
संबंधित बँका व संस्था चालकांना २४ तास सुरक्षा रक्षक ठेवण्याच्या यावेळी प्रशासनाने सूचना केल्या. शिवाय,सी.सी.टीव्ही.चांगल्या दर्जाचा बसवावा,जेणे करून त्यात चेहरा स्पष्ट दिसेल,सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा,शिवाय त्याची स्थानिक पोलिसांच्या मार्फत चारित्र्य पडताळणी करण्यात यावी,बँकेत हेल्मेट व रुमाल बांधून आलेल्या इसमांना ते काढून ठेवण्यास सांगावे,पोलीस स्टेशनचा दूरध्वनी क्रमांक मोठ्या अक्षरात बँकेच्या दर्शनी भागात लावावेत,गर्दीच्या ठिकणी कायम लक्ष ठेवावे,जर काही गडबड अथवा संशियास्पद वाटल्यास,ताबडतोप सुरक्षा रक्षकास सतर्क करावे,बँकेचे सी.सी.टीव्ही.कॅमेरे रस्त्यावर जाण्यायेण्याच्या ठिकाणी लावावेत,जेणे करून या ठिकाणचा सर्व भाग व रस्ते त्या कॅमेऱ्यांच्या कार्यक्षेत्रात येतील. वरील नमूद सर्व सुरक्षा यंत्रणा बँक व वित्त संस्थेच्या जवळ उपलब्ध करण्यात यावी,बँकांत किंवा आपल्या संस्थेत असणाऱ्या अलार्मचे संपूर्ण प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात यावे,अलार्म चे एक बटन कॅशियरच्या जवळ उपलब्ध करण्यात यावे,काही दुर्घटना घडण्याअगोदर,वरील नमूद सर्व यंत्रणा आपल्या संस्थेत किंवा बँकेत असावी. या सह विविध सुरक्षेच्या विषयांवर पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव सर यांनी या वित्तसंस्था चालकांना व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत सूचना दिल्या आहेत. या उपस्थित कर्मचारी व पदाधिकाऱ्यां मार्फत विचारण्यात आलेल्या शंकांचेही निरसन करण्यात आले असून,सुरक्षिततेसाठी आधी काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत,या बैठकीत पोलीस निरीक्षकांनी नमूद केले आहे.
या बैठकीत आय.सी.आय.सी.आय.बँक,सेंट्रल बँक ऑफ इंडिया,स्टेट बँक ऑफ इंडिया,आय.डी.बी.आय.बँक,भिंगार अर्बन बँक तशेच स्थानिक वित्तसंस्था चालक व बँकांचे मॅनेजर तसेच वरिष्ठ कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading