एस.टी.बसचे सर्व सवलतीचे कागदी पास,स्मार्ट कार्ड मध्ये रुपांतरीत होणार…नागरिकांना नोंदनी करण्याचे आवाहन…
श्रीगोंदा दिनांक २२ जून:
बसचे सर्व सवलतीची कागदी पास आत्ता स्मार्ट कार्ड मध्ये रुपांतरीत होणार आहेत.ट्रायमॅक्स आय.टी.कंपनी कडुन ह्या संदर्भातील सर्व माहिती एस.टी.मार्फत अपडेट होणार आहे . ह्या सर्व स्मार्ट कार्डचे राजिस्ट्रेशन चालू असून,प्रत्येक ठिकाणी ह्या कार्डचे सेंटर ही चालू करण्याचे काम चालू आहे.काही ठिकाणी सेंटर चालूही झाले आहेत.स्मार्ट कार्ड मुळे जे खरे लाभार्थी आहेत.त्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे.या प्रक्रियेमूळे बोगसगिरीला आळा बसणार असल्याचे मत ट्रायमॅक्स आयटी चे इंजिनियर अमर घोडके यांनी माध्यमांना सांगितले आहे.
श्रीगोंदा आगारातील सेंटर वरून आत्तापर्यंत पत्रकार कार्ड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार कार्ड, वितरीत केले गेले आहेत.जेष्ठ नागरिकाचे पाहिले कार्ड जे काही दिवसांपूर्वी कंपनीकडे नोंद केले होते.ते सर्वात प्रथम जेष्ठ नागरिक इंगळे यांना मिळाले आहे.हे कार्ड इंगळे यांना सुपूर्द करतांना(श्रीगोंदा आगारचे कंट्रोलर)दिगंबर दरेकर, पिल्ले मॅडम,(ट्रायमॅक्सचे इंजिनिअर)अमर घोडके उपस्थित होते.यावेळी कंपनीचे अमर घोडके व श्रीगोंदा आजाराचे दरेकर यांनी सर्व जेष्ठ नागरिकांना लवकरात लवकर आपल्या कार्डची नोंदणी करण्यासाठी आवाहन केले आहे.त्यामुळे,लाभार्थ्यांना लवकर कार्डचा लाभ मिळू शकेल,असेही ते म्हणाले आहेत.स्मार्ट कार्ड नोंद करण्यासाठी आधार कार्ड,निवडणूक कार्ड, मोबाईल नंबर(एका व्यक्तीला एक),मोबाईल बरोबर आणावा लागणार असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले आहे.
