कुकडी व घोड धरणातून त्वरित कॅनॉलद्वारे पाणी सोडावे :- माजी मंत्री बबनराव पाचपुते 

screenshot_20190630_1000053181814363026283099.jpg

दिनांक ३० जुलै,श्रीगोंदा:
कुकडी  पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने,कुकडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. तसेच, घोड धरणातहि पाण्याची आवक चांगली सुरू झालेली आहे .त्यामुळे ,कुकडी व घोड धरणातून  कॅनॉलद्वारे त्वरित पाणी सोडण्याची मागणी,(जलसंपदा मंत्री)ना.गिरीश महाजन यांचे सह संबंधित अधिकारी यांचे कडे केली असल्याची माहिती,(माजी मंत्री)बबनराव पाचपुते माध्यमांना दिली आहे. 
कुकडी धरणावर मोठया प्रमाणात पाऊस पडत असल्याने,धरणामध्ये चांगला पाणीसाठा निर्माण होत असून, कुकडी व घोड धरणातून तातडीने पाणी सोडल्यास,लाभ क्षेत्रातील विसापूर सह,छोटे,मोठे तलाव,बंधारे भरून  घेण्यास मदत  होणार  आहे.त्यामुळे,कुकडी प्रकल्पातून तातडीने कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यात यावे.तसेच आज रात्री नंतर घोड धरणामध्ये सुद्धा पाण्याची आवक वाढेल.त्यानुसार घोड धरणांमधूनहि आवर्तन सोडणेची मागणी पाचपुते यांनी(जलसंपदा मंत्री)ना.गिरीश महाजन यांचे सह कुकडी चे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ  यांचे कडे केलेली आहे.

 

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading