आईच्या अस्थी शेतात विसर्जन करून त्यावर वृक्षारोपण…
दिनांक २८ जुलै,मढेवडगाव,श्रीगोंदा
मढेवडगाव येथील श्री बाळासाहेब बनकर यांच्या मातोश्री दिवंगत सौ. यमुनाबाई राजाराम बनकर यांचे निधन रविवार दिनांक २१/४/२०१९ रोजी झाले समस्त बनकर कुटुंबीयांनी मोठ्या सन्मानाने त्यांच्या अस्थी शेतात विसर्जन करून,त्यावर आंबा, चिंच,अशा देशी स्मृतिवृक्षांची लागवड केली.त्या वृक्षांच्या रूपानं मातेचे प्रेम आणि आदर्श पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न बनकर कुटुंबियांनी केला आणि समाजाला एक आदर्श घालून दिला आहे.
दशक्रिया विधी मंगळवार दिनांक ३०/७/२०१९ रोजी मढेवडगाव येथे सकाळी ठीक ७:३० वाजता सत्यशोधक पद्धतीने संपन्न होत आहे. या प्रसंगी,बनकर कुटुंबीय मढेवडगाव गावामध्ये वड,पिंपळ आणि चिंच अशा देशी दहा झाडांचे रोपण करणार आहेत. तसेच,एक वर्षभर त्या झाडांचे संगोपन व निगा राखणार आहेत.
असा आदर्श समाजातील प्रत्येकाने उभा करून निसर्गाप्रती आपले योगदान व जबाबदारी जर पार पडली.तर, दुष्काळासारख्या समस्यांना भावी पिढ्यांना सामोरे जावे लागणार नाही.