गणेशवाडी शाळेत वृक्ष लागवड व मोफत गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न.

दिनांक ३० जुलै,गणेशवाडी,श्रीगोंदा:
जि.प. प्रा. शाळा गणेशवाडी शाळेत आज दि. २९ जुलै २०१९ रोजी शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहीमअंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.तसेच,पात्र लाभार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी(सरपंच)सुदामराव नलवडे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती काळे यांनी केले.तशेच आभार श्री आभाळे सर यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी(गणेशा सोसायटीचे चेअरमन)श्री.शांतीलाल खरात व (तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष)श्री.धनंजय लोखंडे यांची भाषणे झाली.नुसती वृक्ष लागवङ करणे महत्वाचे नाही.तर,त्यांचे संवर्धन व संगोपन करणे महत्वाचे आहे. असे प्रतिपादन गणेशा सोसायटीचे चेअरमन श्री.शांतीलाल खरात यांनी केले.
तसेच,तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष श्री.धनंजय लोखंडे यांनी शाळेला पेव्हींग ब्लॉक बसविण्याची मागणी यावेळी केली.या कार्यक्रमाला(सरपंच)श्री.सुदामराव नलावडे,(ग्रा.पं.सदस्य) श्री,सुभाष खोडवे,(उपसरपंच) अंबादास खामकर,(सामाजिक कार्यकर्ते)भुजंग कोल्हटकर,(गणेशा सोसायटीचे चेअरमन)शांतीलाल खरात, (शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष) श्री.नागनाथ खरात ,(उपाध्यक्ष)बापू गरदडे,(माजी उपसरपंच)मंजाबापू खरात,(शाळा व्यवस्थापन सदस्य)शांताराम खरात,(गणेशा सोसायटीचे उपाध्यक्ष)शिवाजीराव कोल्हटकर, (तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष)धनंजय लोखंडे,सुनिल देवमुंढे,(मुख्याध्यापिका)काळे मॅडम व शिक्षक प्रमूख उपस्थित होते .
Related