एम.पी.डी.ए.कायद्या अंतर्गत वांगदरी येथील इसम एक वर्षाकरता स्थानबद्ध…

दिनांक ९ सप्टेंबर वांगदरी(श्रीगोंदा):
जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी अहमदनगर जिल्ह्यातील वाळू तस्कर तसेच धोकादायक व्यक्ती , अवैध धंदे करणारे व पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार,यांच्या विरोधात कडक कारवाईचे संकेत दिले होते.त्या अनुषंगाने श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथील महेंद्र बाजीराव महानोर वय वर्ष २६ सह अजय उर्फ अर्जुन गणेश पाटील वय २० वर्ष राहणार गांधीनगर,कोपरगाव जिल्हा अहमदनगर व सुदाम उर्फ दीपक भास्कर खामकर वय २८ वर्ष राहणार मांडवे खुर्द,तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यांचे विरुद्ध एम.पी.डी.ए.कायद्या अंतर्गत संबंधित पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रात,पाठविलेल्या प्रस्तावावर जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्वीवेदी यांनी अंतिम निर्णय घेऊन,नमूद इसमांना दिनांक ८ सप्टेंबर १९ पासून एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केलेले आहेत.
या आरोपींना (जिल्हा पोलीस अधीक्षक) इशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली सागर पाटील(अप्पर पोलिस अधीक्षक)अहमदनगर,संजय सातव(उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत), (पोलीस निरीक्षक) दौलत जाधव श्रीगोंदा पोलीस स्टेशन सह नमूद पोलीस स्टेशनच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी ताब्यात घेऊन,दिनांक ८ सप्टेंबर पासून एक वर्षाकरिता,नाशिक मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे स्थानबद्ध करण्यात आले आहेत. महेंद्र बाजीराव महानोर याचे विरुद्ध श्रीगोंदा पोस्टेला ८ तर,शिरूर पोस्टेला १ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.ज्यात जबरी मारहाण,जमाव करून मारहाण,चोरी,अपहरण,खुनाचा प्रयत्न,जबरी चोरी, आर्मी ॲक्ट,बलात्कार,नागरी हक्क संरक्षण कायदा सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हे दाखल आहेत.
आगामी काळात वाळूतस्कर,धोकादायक इसम,हातभट्टी दारू,माफिया व अवैध धंदे,झोपडपट्टी दादा यांचे विरुद्ध एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत कारवाई करणार असल्याचे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत नमूद केले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading