अनुसूचित जाती जमाती आयोगाचे न्या.सी.एलं.थूल भानगाव अत्याचार पिडीतांना भेट देण्याची शक्यता..
दिनांक ८ सप्टेंबर भानगाव(श्रीगोंदा):
श्रीगोंदा तालुक्यात दिनांक ५ सप्टेंबर रोजी झालेल्या.आदिवासी अत्याचाराच्या घटनेनंतर,विविध पुरोगामी संघटनांनी या क्रूर घटनेचा निषेध करीत,श्रीगोंदा तालुका दलित-आदिवासी अत्याचारग्रस्त तालुका घोषित करण्याची मागणी केली आहे.जिल्ह्यातील विविध ठिकाणी भानगाव येथील अत्याचाराच्या प्रकरणाचा निषेध होताना समोर येत आहे.या घटनेच्या अनुषंगाने तालुक्यातील वाढते अत्याचार लक्षात घेत, अनुसुचित जाती जमाती आयोगाचे सी.एल.थूल घटनास्थळी भेट देण्याची शक्यता आहे.
यापूर्वीही तालुक्यात झालेल्या घटनांचा आढावा घेतल्यास,श्रीगोंदा तालुक्यात विविध ठिकाणी अनुसूचित जाती जमातीचे राज्य आयोग थूल साहेब पिडीतांना भेटल्याचे सर्वश्रुत आहे.२०१२ साली लिंपणगाव येथे दलित,आदिवासी,मुस्लिम समाजांच्या घरांची राखरांगोळी जातीवाद्यानी केली. त्यावेळेसही थूल साहेबांनी घटनास्थळाला भेत देऊन, स्थानिक प्रशासनास सप्त आदेश दिल्याचे सर्वांना ज्ञात आहे.यापूर्वीच्या भानगाव येथील आदिवासी महिला नग्न मारहान प्रकरणातही,माननीय सी.एल.थूल साहेब यांनी पीडितांनां भेट दिली आहे.त्याचबरोबर श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथे पाच सप्टेंबर रोजी घडलेल्या गणेश काळे या दोन वर्षाच्या आदिवासी समाजाच्या मुलाच्या हत्या प्रकरणात ,महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य माननीय सी.एल.थूल साहेब घटनास्थळी पिडीतांना भेट देणार असल्याची माहिती समजते आहे.
वाढत्या अत्याचारांच्या घटनांचा आलेख,श्रीगोंदा तालुका दलित-आदिवसी अत्याचारग्रस्त तालुका घोषित करण्याच्या मागणीस थूल काय प्रतिक्रिया देतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाच्या कार्य पद्धतीवर निर्माण होणारे प्रश्न.कसे सुटतील ? हेही फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येणार आहे.
तालुक्यातील हि चौथी घटना आहे.ज्यासाठी अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य,श्रीगोंदा कार्यक्षेत्रात आलेले आहेत. श्रीगोंदा तालुक्यात घडणाऱ्या दलित-आदिवाशी अत्याचारांच्या घटनां राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या वारंवार पटलावर येतांना,आयोगाचे काय आदेश असतील? हेही तालुक्यातील दलित आदिवासी चळवळीतील कार्यकर्त्यांसह पीडितांच्या समोर येणार आहे.