साई सेवा पतसंस्थेचा कार्यकृती बद्दल,राज्य शासनाच्या “सहकार भूषण” पुरस्काराने सन्मान:
सांगली,कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी ५,५५,५५५ रुपयांचा धनादेश,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करतांना,जिल्ह्याचे (पालकमंत्री)राम शिंदे,(माजी मंत्री)बबनराव पाचपुते तसेच संस्थेचे (अध्यक्ष)ज्ञानदेव पाचपुते समवेत संस्थेचे संचालक.. (छायाचित्र: अमर घोडके).
**************************
दिनांक ८ सप्टेंबर,काष्टी(श्रीगोंदा):
तालुक्यातील काष्टी येथील “साई सेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला” महाराष्ट्र शासनाच्या सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाचा,”सहकार भूषण” पुरस्कार प्राप्त झाला आहे.तसेच संस्थेने सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाच लाख ५५ हजार ५५५ रुपयांचा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलों असल्याची माहिती काल संस्थेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव पाचपुते व उपाध्यक्ष उत्तम मुळे यांनी दिली.
यावेळी बोलतांना पाचपुतेनी संस्थे विषयी माहिती दिली. संस्थेची स्थापना २१ जानेवारी १९९९ रोजी २६५ सभासदांच्या २६ हजार ५०० रुपयांच्या ठेवी ने करण्यात आली. ३१ मार्च २०१९ अखेर संस्थेचे वसूल भागभांडवल १ कोटी ९३ लाख ७० हजार रुपये इतके झाले आहे. संस्थेमार्फत ४१ कोटी ५१ लाख ४६ हजार झाले आहे.काष्टी येथे संस्थेचे अत्याधुनिक सोईयुक्त,सेफ डिपॉझिट प्रशस्त इमारत आहे.संस्थेचे सर्व व्यवहार संगणीकृत असून,सभासदांना चेक क्लिअरिंग,आर.टी.जी.एस.,मनी ट्रान्स्फर,डी.डी.,ए.टी.एम., यासारख्या बँकिंग सुविधांसाठी व्यापारी राष्ट्रीयकृत तसेच कार्पोरेट बँकांबरोबर करार केलेला आहे.संस्थेने ग्रामीण भागातील महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून काम केले आहे. महिला बचत गटांची राजमाता महिला बचत गटांची शृंखला तयार केली आहे.तालुक्यातील ग्राहकांना बँकिंग सुविधा देण्यासाठी श्रीगोंदा, ढवळगाव,बेलवंडी,बेलवंडी इत्यादी ठिकाणी शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. मढेवडगाव येथे लवकरच नवीन शाखा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा पाचपुते यांनी यावेळी केली आहे.संस्थेच्या कार्यकृतींची दखल घेत,राज्य शासनाने सन २०१३ चा “सहकार निष्ठ” पुरस्कार,सन २०१५ चा “बँक पुरस्कार”,सन २०१५ मध्ये “महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन” यांच्यातर्फे “दीपस्तंभ पुरस्कार” त्याचबरोबर सन २०१६ मध्ये “सहकारनिष्ठ” पुरस्कार मिळाले आहेत.