ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही तपासात चालढकल;पीडितांचा आरोप..

दिनांक ३० सप्टेंबर,मांडवगण(श्रीगोंदा):
मांडवगण मधील कोळी समाजातील अल्पवयीन मुलीची छेड काढून,तिच्याशी व तिच्या घरच्यांशी गैरवर्तन करीत,उलट मुलीच्या घरच्यांना धमकाविले प्रकरणी,श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये सदाशिव दत्तात्रय खेंडके व अजय बाळासाहेब धनवट या आरोपीं विरोधात भा.दं.वि.कलम ३५४(A),३५४(D),३४१, बालकांचे लैंगिक शोषण संरक्षण कायदा तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा(ॲट्रॉसिटी)नुसार दिनांक १९ डिसेंबर २०१८ रोजी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या घटनेला आता जवळजवळ दहा महिने होत आले आहेत.तरी अजून न्याय मिळालेला नसल्याचे पीडितांचे म्हणणे आहे.पोलिसांनी आरोपींवर कोणतीही कारवाई केलेली नाही.पोलिसांना कारवाई बाबत विचारले असता तपास चालू आहे.आरोपी फरार आहेत. अशी उडवाउडवीची उत्तरे पोलीस प्रशासनाकडून येतात. आम्ही कामानिमित्त बाहेर असतो ‌.या संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी.आमच्या कुटुंबाला यांच्यापासून धोका आहे.जर आरोपीवर कारवाई झाली नाही.तर,येत्या दिवाळीत श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसुन,कारवाईतील वेळकाढूपणाचा निषेध करणार असल्याचे पीडित मुलीचा भाऊ सुनील जाधव यांनी माध्यमांना सांगितले आहे.
याप्रकरणी पोलिसांना माहिती विचारली असता,आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला असल्याचे माध्यमांना सांगितले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading