वर्षावास मालिकेतील तेरावा धम्म देसना कार्यक्रम येळपणे येथे संपन्न..

दिनांक ३० सप्टेंबर,येळपणे(श्रीगोंदा):
दिनांक २९ सप्टेंबर रोजी येळपणे ता.श्रीगोंदा येथे भारतीय बौद्ध महासभा ता.श्रीगोंदा आयोजित वर्षावास मालिकेतील तेरावा धम्म देसना कार्यक्रम संपन्न झाला. बुद्ध वंदनेने कार्यक्रमास सुरवात झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक (भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस)आयु.पंडित कांबळे यांनी केले.त्यानंतर आयु.सतीश हुलसर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आयु.सतीश ओहळ सर यांनी दस पारमिता या विषयावर धम्म देसना दिली.(भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष)आयु. प्रशांत चव्हाण सर यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आभार आयु.अवि कांबळे यांनी मानले.तर, सूत्रसंचालन आयु.पंडित कांबळे यांनी केले.यावेळी आयु.विलास कांबळे व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयु.विठ्ठल नितनवरे यांनी भूषविले. कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading