विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू..

४ ऑक्टोबरपर्यंत विधानसभेकरीता उमेदवारी अर्ज भरता येणार…

दिनांक ३० सप्टेंबर,श्रीगोंदा:
२७ सप्टेंबर पासून विधानसभा निवडणुकीकरीता इच्छुक व्यक्तींना तहसील कार्यालय, श्रीगोंदा येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज सादर करता येतील. दिनांक ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येतील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी म्हणजे चौथा शनिवार तसेच गांधी जयंतीच्या दिवशी उमेदवारी अर्ज सादर करता येणार नाहीत.उमेदवारी अर्ज तहसील कार्यालय, श्रीगोंदा येथे उपलब्ध आहेत.
अर्जांची छाननी दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, श्रीगोंदा येथे करण्यात येईल. त्यानंतर दिनांक ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी दुपारी ३ नंतर चिन्ह वाटप करण्यात येईल.अर्ज दाखल करताना उमेदवारा सोबत केवळ ४ व्यक्तींना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या परिसरात मोबाईलच्या वापरावर बंदी आहे. सर्व नागरिकांनी निवडणुकीच्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन श्रीगोंदा निवडणूक प्रशासनाने केले आहे.
उमेदवारी अर्जासोबत रुपये १०,०००/- अनामत रक्कम रोख अथवा विहित स्वरूपात चलनाने भरता येईल.अनुसूचित जाती / जमातीच्या व्यक्तींस रुपये ५,०००/- इतकी अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवारास एक सूचक तर इतर उमेदवारांसाठी १० सूचक असणे आवश्यक आहे. केवळ श्रीगोंदा तालुक्यातील मतदार सूचक असू शकतात. उमेदवाराचा प्रचार खर्च हा रुपये २८ लाखाच्या मर्यादेत असावा. यासाठी त्यांनी स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे.उमेदवारांनी दैनंदिन निवडणूक प्रचारावरील खर्च दिलेल्या नमुन्यात निवडणूक खर्च कक्षाकडे सादर करणे बंधनकारक आहे.राजकीय पक्षांना व उमेदवारांना त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत विहित नमुन्यात प्रसिद्धी द्यावी लागणार आहे.
निवडणूक विषयक विविध परवानग्यांकरिता तहसील कार्यालयात एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.याविषयी प्रसार माध्यमांना माहिती देण्यात आली आहे. २२६ श्रीगोंदा विधानसभा मतदार संघासाठी श्री नागेंद्र दीक्षित (भा.प्र.से.)यांची निवडणूक निरीक्षक (खर्च)म्हणून नियुक्ती झालेली आहे.निवडणूक निर्णय अधिकारी श्री अजय मोरे यांच्या कडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते आहे कि,उमेदवारांच्या निवडणूक खर्चाविषयी काही तक्रार अगर हरकत असल्यास,श्री नागेंद्र दीक्षित यांच्याशी ७३८५८०५५३२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading