कर्मवीरांच्या त्यागामुळे रयत उभा :खंडेराव शेंडगे..

दिनांक २९ सप्टेंबर,कर्जत:
कर्मवीर भाऊराव पाटील व सौ . लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या असीम त्यागातून रयत शिक्षण संस्था शताब्दी वर्षात खंबीर पणे उभी आहे.असे मत श्री. खंडेराव शेंडगे यांनी केले.न्यू इंग्लिश स्कूल शिंदे,ता.कर्जत येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
यावेळी,जयंतीचे औचित्य साधून श्री.अभय शेठ बोरा यांचे माध्यमातून श्री आशिष बोरा (C.A)यांनी ३० हजार रुपये रोख देणगी दिली.तसेच,संदीप घालमे यांच्या माध्यमातून कांतीशेठ बापूराव आरडे यांच्याकडून १००००० रुपये देणगी देण्याचे जाहीर केले. मुलांसाठी स्नेह भोजनाची सोय श्री.अभय कुमार बोरा व मोहन सुभेदार घालमे यांनी केली.
प्रमुख वक्ते श्री.जामदार सर यांनी सत्यशोधक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जीवन चरित्रावर विद्यार्थांना मार्ग दर्शन केले.कार्यक्रमास शिंदे गावातील प्रथम नागरिक मधुकर घालमे,सुभाष घालमे,रुपचंद घालमे,बाळासाहेब घालमे,कुशाबा घालमे,रामदास घालमे,सीताभाऊ घालमे,मोहन घालमे,दादा कचरू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री.गोसावी सर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.
याप्रसंगी,क्रिडा स्पर्धा बक्षिसाचे वितरण श्री.माने डी.ए.पोकळे आर .डी.,चित्रकला स्पर्धेचे वितरण श्री.पवार डी.व्ही व रांगोळी स्पर्धचे वितरण श्री.थोरात डी.ए.यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.शिंदे बी.डी सर व श्रीमती काळे बी.पी यांनी केले.मान्यवरांची ओळख श्री.ओहोळ एस.जी यांनी करून दिली.तर,आभार प्रदर्शन श्री. सोलंकर सर यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading