चांगदेव भालेराव यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त,अभिवादन सभेचे आयोजन…

दिनांक २७ सप्टेंबर(हिवरगाव पावसा),संगमनेर:
आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते,जिल्हा सहकारी बँक,मागासवर्गीय व इतर मागास वर्ग कर्मचारी संघटनेचे संस्थापक आणि कला सम्राज्ञी पवळा कला मंच व महात्मा फुले,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,राजश्री शाहू महाराज विचार मंचाचे सचिव तसेच मुख्य प्रवर्तक कालकथित चांगदेव लहुजी भालेराव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त हिवरगाव पावसा येथे  २२ सप्टेंबर रोजी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर अभिवादन सभेला श्रीकांत भालेराव (प्रदेशाध्यक्ष आरपीआय ),काशिनाथ पावसे (तालुकाध्यक्ष भाजपा),संजय डहाणे(जिल्हा प्रभारी बसपा),उमाशंकर यादव (जिल्हा अध्यक्ष,बसपा),मेजर राजू शिंदे(महासचिव बसपा),(मागासवर्गीय बँक संघटनेचे सचिव) आप्पासाहेब गोपाळघरे,प्राध्यापक गणपत पावसे, विलास कदम(वंचित बहुजन आघाडी,संगमनेर) इत्यादिंच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन सभा संपन्न झाली.
श्रीकांत भालेराव यांनी कालकथीत चांगदेव लहुजी भालेराव यांच्या स्मृतीस उजाळा देत,सामाजिक कार्यात चांगदेव भालेराव यांचा निस्वार्थीपणा, दानशूरवृत्ती, कार्यतत्परता,त्यागीवृत्तीची माहिती उपस्थित जनसमुदायस दिली.आद्यनृत्यांगना नामचंद पवळा भालेराव यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी कला सम्राज्ञी पवळा कला मंच या संस्थेतर्फे,शासन दरबारी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.शेवटच्या श्वासापर्यंत नामचंद पवळा भालेराव यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी चांगदेव भालेराव कशाप्रकारे प्रयत्न करीत होते. त्याबद्दल सविस्तर माहिती दिली.तसेच (केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री) रामदास आठवले यांनी सदर स्मारकासाठी मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले.
तसेच चांगदेव भालेराव यांनी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम बौद्ध कला सांस्कृतिक प्रशिक्षण केंद्र प्रकल्प मंजूर करण्यासाठी मोठ्या शर्तीचे प्रयत्न केले आहेत. या बौद्ध कला सांस्कृतिक केंद्रांमुळे हिवरगाव पावसा येथे बौद्ध पर्यटन स्थळ म्हणून, उदयास येईल.असे अभिवादन पर बोलतांना सांगितले.
काशिनाथ पावसे यांनी स्मृतीस उजळा देत, चांगदेव भालेराव यांचे अपूर्ण राहिलेले “बौद्ध कला सांस्कृतिक प्रशिक्षण केंद्र प्रकल्प” तसेच नामचंद पवळा भालेराव यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचन दिले.
प्राध्यापक गणपत पावशे हे अभिवादन पर बोलताना म्हणाले,मनुष्य किती वर्ष जगला? यापेक्षा तो कसा जगला? याला महत्त्व आहे.समाजात स्वतःसाठी जगणारा एक वर्ग आणि दुसऱ्या साठी जाणारा दुसरा वर्ग आहे.चांगदेव भालेराव हे दुसऱ्यांसाठी म्हणजे समाजासाठी जाणारे व्यक्तिमत्व होते.त्यांनी गरिबीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन,नोकरी मिळवली.बँकेत नोकरी करत असताना, विविध संस्था स्थापन करून, समाजातील उपेक्षित घटकांना प्रशासकीय मार्गाने न्याय देण्याचे चांगदेव भालेराव यांनी कार्य केले.”बौद्ध कला सांस्कृतिक प्रशिक्षण केंद्रास” केंद्र सरकारची मंजुरी मिळवली.सदर केंद्रामुळे हिवरगाव पावसा गावाचे नाव देशपातळीवर पोहोचण्यासाठी मदत होणार आहे.
अभिवादन सभेस नालंदा बुद्ध आश्रम कोची येथील भन्ते करुणानंद यांचे शिष्य भन्ते मोगलायन,भन्ते विस्वद्विप,भन्ते महाणाम,यांच्या मार्गदर्शनाखाली धम्म रिवाजाप्रमाणे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला.
या अभिवादन सभेचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य रामदास भालेराव यांनी केले.तर,अभिवादन सभा यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब भालेराव,सोमनाथ भालेराव, गौतम भालेराव,विजय निळे,राजू दारोळे,विकास दारोळे, रोहित भालेराव,अर्जुन मुंतोडे,रोहिणी भालेराव, अभिजित भालेराव,सुयोग भालेराव, अभिमन्यू मुंतोडे,सागर कदम,बाबासाहेब कदम, विशाल कदम,चेतन भालेराव,सूचक चाबुकस्वार इत्यादी युवक कार्यकर्ते तसेच समता सैनिक दलाच्या सैनिकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading